' रयत ' मधला विद्यार्थी कधीही वाया जात नाही - आमदार संजयमामा शिंदे.
रयत शिक्षण संस्थेमध्ये
आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही वाया जाणार नाही , तर तो स्वावलंबी बणून , शिकून मोठे होऊन स्वतःच्या पायावर उभा राहणारा असून , न्यू इंग्लिश स्कूल मधील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केल्याने , संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवउद्गार आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .
टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व एस.एस.सी विद्यार्थी शुभचिंतन व गुणवंत विद्यार्थी बक्षिस वितरण सोहळा शनिवारी 25 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी आमदार शिंदे बोलत होते. प्रारंभी प्राचार्य एस .डी . लेंडवे यांच्या हस्ते आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. टीव्ही स्टार प्रा.जितेश कोळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे , स्त्री शक्ती महिला मंडळाचे अध्यक्षा शिलाताई पाटील , परमेश्वर देशमुख , स्कूल कमिटीचे सदस्य रमेश येवले पाटील , वसंतराव येवले पाटील , धनंजय मोरे , ॲड .संतोष कानडे , शिवसेनेचे सुरेश लोंढे , प्राचार्य एस. डी. लेंडवे , नानासाहेब काळे, विजयकुमार कोठारी , मदनकुमार शहा , भास्कर सोनवणे , राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष धनाजी भरगंडे , वैभव महाडिक , महादेव गायकवाड , दादासाहेब खोचरे , पोपट मोरे ,धर्मा कुटे ,अनिल जगताप ,कासीम आतार , सतीश सुर्वे , पराग व्होरा , एस. के. शिंदे उपस्थित होते .
यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम पटकावलेला आदित्य मोरे , हर्षद ढवळे , प्रतीक्षा डोके , मिरगणे यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी विद्यार्थ्याकडून शाळेला भेटवस्तू म्हणून साऊंड बॉक्स व 11 हजार रुपये देणगीचा चेक सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस. देशमुख व आर.ए. बरबडे यांनी केले तर आभार आर.डी. सावंत यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा