Breaking

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

मराठी भाषा गौरव दिन साजरा*



*मराठी भाषा गौरव दिन साजरा*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर व विधीज्ञ मंडळ, तुळजापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता तुळजापूर दिवाणी न्यायालय क. स्तर, तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री. मिलिंद म. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर  तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर हे होते. तसेच या कार्यक्रमास मा.ॲड.श्री.एस. एच. पवार, अध्यक्ष, विधिज्ञ मंडळ, तुळजापूर, विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते.

मा.श्री. मिलिंद म. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर  तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर यांनी येथे उपस्थित विधीज्ञाना, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले. मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व काय आहे याबाबत बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक 27 फेब्रुवारी 1912 असल्याने दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हे सांगितले. यावेळी मा. श्री. मिलिंद म. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर यांनी कुसुमाग्रजांच्या "कणा" या कवितेचे योग्य असे विश्लेषण करून त्याबाबत उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री.एस.बी. खांडके, बेलीफ यांनी "कणा" या कवितेचे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाचन केले. यावेळी ॲड.श्री. कृष्णा के. कुलकर्णी यांनी मराठी भाषा दिना बाबत बहुमूल्य असे मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले.
यावेळी जेष्ठ विधीज्ञ,  विधीज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा