बेंबळे येथे शिवजयंती उमंग उत्साहात साजरी ....
रणजीतभैय्या शिंदें व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन ...
बेंबळे ।प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त बेंबळे नगरीतून सकाळी आठ वाजता शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी युवक युवती व शेकडो विद्यार्थी भगवे फेटे बांधून व जिजामाता, शिवराय व लढाऊ मावळे यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सामील झाले होते. लेझीम, ढोल, ताशे हलगी आदी वाद्यांच्या गजरात तसेच जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयकार करत पालखी मिरवणूक संपन्न झाली. यानंतर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत भैया शिंदे यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठित नागरिक शंकर शिरसट, माजी सरपंच कैलास भोसले, संजय पवार, शहाजी भोसले ,संतोष शिंदे सर, दादा भोसले ,मुकुंद रामदासी, सिद्धेश्वर शिंदे ,काळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी राजसिंहासन स्थित शिवरायांच्या भव्य मूर्तीचे पोपट आनपट ,सरपंच विजय पवार, बबलू काळे, विश्वजीत भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक सामील झाले होते, ढोल ताशा लेझीम बेंजो बँड आदि वाद्यांच्या गजरासह लेसर किरण विद्युत इफेक्ट्स हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरत होते, भगव्या गुलालाची प्रचंड उधळण करण्यात येत होती, जय भवानी जय शिवराय, जय जयकार घुमत होता. मिरवणूक छत्रपती चौकात आल्यानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय गिरीश जोग, बेंबळे बीट अंमलदार बी,एस ,हजारे, तुकाराम माने- देशमुख' बीट कॉन्स्टेबल कुलकर्णी, अशपाक शेख, सलीम पठाण, व पोलीस पाटील विभीषण कीर्ते यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करून या भव्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा