Breaking

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

बेंबळे येथे फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन....



बेंबळे येथे फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन....


 बेंबळे। प्रतिनिधी।             

            माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथील गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी व श्रमसंस्कार इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले . 

प्रारंभी सरपंच विजय पवार व मुकुंद रामदासी यांचे हस्ते सरस्वती व शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रूपाली बेंदगुडे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे माजी सरपंच कैलास भोसले पत्रकार सिद्धेश्वर शिंदे शिक्षण संस्थेचे संचालक यशवंत भोसले युवक नेते अविनाश भोसले सोसायटीचे सचिव महादेव गाडगे उपसरपंच गोरख अनपट पोलीस पाटील बिभीषण किर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी फार्मसीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एक विलोभनीय पथनाट्य सादर केले व सर्वांची वाहवा मिळवली. 

प्राध्यापक यशवंत भोसले यांनी या श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश सांगून ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा असून यातील स्वयंसेवकांनी स्वतःबरोबर समाज व राष्ट्र विकासात योगदान करणे महत्त्वाचे आहे. अविनाश भोसले यांनी सर्वांची ओळख करून दिली व  शिबिराचा उद्देश आणि हेतू समजावून सांगितला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छता केली, तसेच ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह इत्यादी बाबीची तपासणी करून आहार, व्यायाम व निर्वसनी राहणे या विषयी मार्गदर्शन केले. गावातील शिक्षक, युवक व सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना योग्य प्रकारे सहकार्य केले. शेवटी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंदगुडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा