Breaking

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवण्यासाठी माढा काँग्रेसतर्फे महावितरणला निवेदन...


शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवण्यासाठी माढा काँग्रेसतर्फे महावितरणला निवेदन...

ऐन पीक हंगामात वीज वितरण कंपनी महावितरणकडून सध्या माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतीपंपांसाठीच्या वीज तोडण्याचे काम सुरू आहे.

महावितरणने वीजतोडणीचे हे काम त्वरित थांबवून ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजजोडण्या तोडलेल्या आहेत त्या पुन्हा त्यांना जोडून द्याव्यात
तालुक्यात आता सगळीकडे उन्हाळ्याची चाहूल लागलेली दिसून येत आहे. पाण्याची कमतरता असूनदेखील येथील शेतकरी थोड्याफार उपलब्ध पाण्यावर कशीबशी पिके घेतात.
त्यातच वीजेचा वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि, कधीतर थेट वीजतोडणीचीच कारवाई यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत.
सध्या राज्यशासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
शेतकऱ्यांचे व त्यांच्या उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शेतीसोबतच पिण्याच्या आणि, जनावरांसाठी वापराच्या पाण्याचा प्रश्न खंडित वीजपुरवठ्यामुळे ऐरणीवर आलेला आहे.
तरी; वीज वितरण कंपनीने याचा विचार करून शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली आहे.
सदर वीजजोडण्या पूर्ववत न केल्यास  सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तालुक्याचे नेते दादासाहेब साठे,  याच्या नेतृत्वाखाली  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल  असा इशाराही  माढा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने मा. तालुकाध्यक्ष सौदागरदादा जाधव, यांनी यावेळी देला.
जर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला तर, त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्यशासन आणि अधिकारी वर्गाची राहील असेही यावेळी सांगण्यात आले.

माढा तालुका काँग्रेस कमिटीचे मा.अध्यक्ष सौदागरदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज टेभुणी येथे  उप-अभियंता श्री.रस्तुगे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, व्हीजेएनटी विभागाचे प्रदेश सरचिटणीस भिमराव बंडगर, काँग्रेस सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष सोमनाथकाका  कदम, विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रदीप तोडकर, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र कांबळे, भारत नवले, माजी सरपंच विठ्ठल गायकवाड यांच्यासह सचिन जाधव, सोमनाथ पाटील, कुबेर तोडकर, बाळकुमार जाधव, अरुण चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा