Breaking

सोमवार, २० मार्च, २०२३

सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी 30 मार्चपर्यंत चालू राहणार.... पंढरपूरच्या चैत्रिवारीसाठी पाण्याची उपलब्धता ..... शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे ......धीरज साळे



सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी 30 मार्चपर्यंत चालू राहणार....
 पंढरपूरच्या चैत्रिवारीसाठी पाण्याची उपलब्धता ..
... शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे 
                                   ......धीरज साळे  



बेंबळे।प्रतिनिधी।                            

            सोलापूर शहरासाठी सहा हजार क्युसेक्स  ने भीमा नदीत सोडलेले पाणी 30 मार्चपर्यंत चालू राहणार असून एकूण साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, याच दरम्यान एक एप्रिल रोजी पंढरपूरच्या चैत्री वारीसाठी या पाण्याचा मोठा उपयोग होणार असून कालवा, बोगदा व सिंचन योजना मधूनही शेतीसाठी उन्हाळी आवर्तन चालू आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज करावेत व  पाणीपट्टी भरून शासनाला सहकार्य करावे असे आव्हान जलसंपदा विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी केले आहे.
                 वृत्तांत असा की सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी व औंज बंधाऱ्यातील पाणी साठा कमी झाला असून 29 ते 30 मार्च पर्यंत शहराला पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे ,त्यामुळे सोलापूर आयुक्तांच्या मागणीनुसार उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स(जे पाणी फिरून नदी प्रवाहात येते) व धरणाच्या आठ दरवाज्यातून चार हजार चारशे क्यूसेक्स असे एकूण सहा हजार क्यूसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे. भिमानगर  ते औंज हे नदी प्रवाहाचे 232 किलोमीटर अंतर 9 ते 10 दिवसात पार करून 28 किंवा 29 मार्च दरम्यान टाकळी व औंज बंधाऱ्यात पाणी पोहोचणार आहे, व त्यामुळे सोलापूर शहराला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही , या नऊ ते दहा दिवसात साडेपाच टीएमसी पाण्याचा विसर्ग नदीत होणार आहे.
 सध्या उजनी धरणात 52% पाणी व 91 टीएमसी एकूण पाणीसाठा तर 58 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे .धरण जलाशयातुन नदीप्रवाह 6हजार क्युसेक्स,भीमा सिना बोगदा 1000 क्युसेक्स ,कालवा 3000 क्युसेक्स, सिना माढा सिंचन योजना 333 तर दहिगाव १२० क्युसेक्स ने पाणी विसर्ग चालू आहे .ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे शेतकरी व नागरिक समाधानी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा