Breaking

मंगळवार, १४ मार्च, २०२३

आठ दिवसात पाच रुग्णांना साडेतीन लाखाची मदत***करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी***



आठ दिवसात पाच रुग्णांना साडेतीन लाखाची मदत*


करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी***


करमाळा /प्रतिनिधी/

संवेदनशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून गेल्या आठ दिवसात करमाळा तालुक्यातील
 पाच रुग्णांना एकूण साडेतीन लाख रुपयांची आर्थिक मदत संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली असून या योजनेचा तालुक्यातील जनतेला मोठा उपयोग झाल्यामुळे रुग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे

करमाळा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रोहित वायबसे वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे सहसमन्वयक शिवकुमार चिवटे रुग्ण सहाय्यक नागेश शेंडगे या कार्यकर्त्यांनी संबंधित रुग्णांचे कागदपत्र घेऊन विहित नमुन्यात अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षात जमा करून ही निधी मिळून देण्यास प्रमुख भूमिका बजावली

भुजंग कृष्णाजी गीते राहणार वंजारवाडी यांना गुडघ्याच्या ऑपरेशन साठी पन्नास हजार रुपये मदत झाली आहे  सुमित्रा पोपट खराडे राहणार मोहल्ला गल्ली करमाळा
 या मुलीला एक लाख रुपयाची मदत झाली 
मंगल अप्पाराव घुले यांना 50हजाराची मदत झाली आहे मदत
  नारायण गुरुदेव इंगळे कंदर
तर यशोदा बाळासाहेब जाधव राहणार वीट यांना एक लाख रुपयाची मदत  झाली आहे


शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष याचे करमाळा स्वतंत्र ऑफिस असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरत आहे
ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला सविस्तर माहिती देऊन संबंधित रुग्णाचा अर्ज भरून घेऊन हा अर्ज ऑनलाइनने मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो व याचा संपूर्ण पाठपुरावा करून शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कार्यकर्ते संबंधित रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात ज्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाची मदत हवी असेल त्यांनी करमाळा  संपर्क साधावा असे आव्हान रोहित वायबसे यांनी केले आहे

***************
  महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
*******
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा या कार्यालयातून परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो येणाऱ्या रुग्णाला संपूर्णपणे सखोल माहिती दिली जाते व संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटल वरच्या खात्यावर रक्कम पोच करेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो गेल्या सहा महिन्यात शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष करमाळा या कार्यालयातून जवळपास 40 लाख रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना मिळून देण्यात आली आहे रुग्णांना त्यांच्या बिलात सवलत मिळून देण्यासाठी शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधील दहा टक्के हातामधील जागा रुग्णांना उपलब्ध करून देण्यास आम्ही भूमिका महत्त्वाची पार पाडत आहोत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा