Breaking

मंगळवार, १४ मार्च, २०२३

जिल्ह्यातील भुमिअभिलेखकडील सप्टेंबर 2022 पर्यंतची प्रलंबित मोजणी प्रकरणे मार्च 2023 अखेर पर्यंत निकाली काढणार.. ् ना. राधाकृष्ण विखे-पाटील आ. बबनदादा शिंदे यांच्या तारांकित प्रश्नाला महसूल मंत्र्यांचे उत्तर.....



जिल्ह्यातील भुमिअभिलेखकडील सप्टेंबर 2022 पर्यंतची प्रलंबित मोजणी प्रकरणे मार्च 2023 अखेर पर्यंत निकाली काढणार..
               ना. राधाकृष्ण विखे-पाटील 
आ. बबनदादा शिंदे यांच्या तारांकित प्रश्नाला महसूल मंत्र्यांचे उत्तर.....


 बेंबळे /प्रतिनिधी ........ मुकुंद रामदासी

   
                   
            सोलापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडील सप्टेंबर 2022 अखेर पर्यंतची सर्व प्रलंबित मोजणी प्रकरणे शासनाकडून मार्च 2023 अखेरपर्यंत निकाली काढली जाणार असल्याची माहिती  राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान सभेत दिली, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी याप्रकरणी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला नामदार विखे पाटील यांनी सभागृहात उत्तर देताना ही माहिती दिली .



                    सविस्तर वृत्त असे की सध्या चालू असलेल्या अधिवेशनात माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी व भूसंपादन प्रकरणाविषयी शासन काय कार्यवाही करणार....? तसेच संबंधित कार्यालयात अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग असून जमीन मोजण्याचे साहित्यही अपुरेच आहे त्यामुळे हजारो मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत व या कारणास्तव जिल्ह्यात जमीन मोजणीची प्रक्रिया संथ गतीने होत आहे.  मोजणी प्रकरणास पैसे भरून देखील विलंब होत असल्यामुळे संबंधित नागरिकांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, याबाबत शासनाने काय नियोजन केले आहे? असा तारांकित प्रश्न आमदार बबनदादा शिंदे यांनी उपस्थित केला होता.
               या प्रश्नावर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील  उत्तर देताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 अखेरपर्यंत 12845 मोजणी प्रकरणे दाखल आहेत, यापैकी 7731 प्रकरणे निकाली काढलेली आहेत व 5114 प्रकरणे प्रलंबित आहेत , यामध्ये 42 प्रकरणे भूसंपादनाची आहेत. महसूल मंत्री पुढे म्हणाले की प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी भू-करमापक यांना  मोजणी कामासाठी मदतनीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच मोजणीसाठी पुरेशा प्रमाणात ईटीएस मशीन व रोव्हर मशीन देण्यात आलेले असून सप्टेंबर 2022 अखेर पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे मार्च 2023 अखेर पर्यंत निकाली काढण्याचे शासनाचे नियोजन आहे . 
         अधिक माहिती देताना नामदार विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यात 333 मंजूर पदांपैकी 94 पदे रिक्त आहेत , 60 टक्के क वर्ग संवर्गातील पदे आहेत व 11 उपनिरीक्षक पदे आहेत .त्याचप्रमाणे भूकरमापक व लिपिक या गटातील रिक्त पदे भरती करण्याकरता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आलेली असून त्याचा निकाल  जाहीर झालेला आहे व लवकरच सदर पदावर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याचे शासनाचे नियोजन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा