Breaking

रविवार, १२ मार्च, २०२३

यशराज पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..*


*यशराज पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..*


उस्मानाबाद - धाराशिव :- तुळजाई शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित यशराज पब्लिक स्कुल धाराशिव शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सामाजिक क्रांती म्हणजे च्या प्रदेश अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई गायकवाड संतोष लांडगे यांच्या, उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुदायिक वाचन व माता जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली.सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी  प्रिन्सिपॉल मॅडम यांना संविधान उद्देशिकाची प्रत भेट देण्यात आली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन विविध क्षेत्रातील महिला भगिनींचा सन्मान संस्थेच्या प्रिन्सिपॉल रेखाताई जेवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.मान्यवरांनी आपापल्या मनोगतातुन महिला,अन्याय अत्याचारा व गुड टच बॅड टच अर्थात चांगला स्पर्श,वाईट स्पर्श या विषयी माहिती दिली तसेच सुशीला ताई गायकवाड यांनी मुलांना व पालकांना आपण कोणाचातरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेत चला हे आपल्या छोट्याशा शब्दातून संदेश दिला व मुलांना मार्गदर्शन केले, यात छेडछाड पथक विभाग पोलिस निरीक्षक हिना शेख मॅडम,उप पोलीस निरीक्षक देवयानी मॅडम,जाधव मॅडम,उद्योजक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुरेखाताई कुंभार,सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे,सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे,  यांना सन्मानित करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता युसुफ भाई सय्यद यांचे योग्य असे नियोजन व मार्गदर्शन ठरले,चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गितावर डांस करुन कलागुण सादर केले.या वेळी यशराज पब्लिक स्कुलचे शिक्षक कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक,महिला भगिनी अन्य इतर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा