Breaking

मंगळवार, १४ मार्च, २०२३

चव्हाणवाडी (टें) बेंबळे शिव रस्ता मुरमीकरण समारंभ.



चव्हाणवाडी (टें) बेंबळे शिव रस्ता मुरमीकरण समारंभ.


टेंभुर्णी प्रतिनिधी.

चव्हाणवाडी (टें) बेंबळे शिव रस्ता 
 बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारा चव्हाणवाडी (टें) ते बेंबळे शिव रस्ता तालुक्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून २५/१५ अंतर्गत मंजूर झाला असून या रस्त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष  रणजीत शिंदे यांच्या शुभहस्ते व बंडुनाना ढवळे यांच्या उपस्थिती मध्ये व तसेच चव्हाणवाडीतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये  दिनांक 14 मार्च 2023 रोजी शुभारंभ झाला.
            यावेळी माढा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी नुकतीच निवड झालेले बंडूनाना ढवळे यांचा सत्कार तंटा मुक्तीचे अध्यक्ष अरुणबापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रणजीत शिंदे म्हणाले की चव्हाणवाडी हे गाव आमदार बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी कायम असणारे गाव म्हणून ओळखले जाते या गावाच्या विकासासाठी आम्ही कुठलाही निधी कमी पडू देणार नाही गावातील सरपंच व नेतेमंडळी यांनी कुठलेही गट तटाचे राजकारण न करता गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. अशा सूचनाही त्यांनी गावातील सरपंच व नेते मंडळी यांना दिल्या
           प्रसंगी उपस्थित गावचे सरपंच नवनाथ शिंदे,तंटामुक्ती अध्यक्ष अरूणबापु चव्हाण,चेअरमन अशोक मिस्कीन, हनुमंत चव्हाण, उपसरपंच बाळासाहेब मोठे,  सचिन चव्हाण, मा. चेअरमन नरहरी नांगरे,मा.सरपंच सुनील मिस्किन,अर्जुन सलगर, सोसायटीचे चेअरमन कैलास चव्हाण, सोसायटीचे संचालक महावीर नांगरे, शिवशंकर हॉटेलचे मालक व संचालक बाळासाहेब चव्हाण, तानाजी चहाण, सैदागर नांगरे, अंकुश सलगर, बापूराव मिस्कीन, मा सरपंच संजय मिस्किन, भागवत खडके, युवक नेते विजय कदम, मंगेश नांगरे, सुधीर नांगरे, राजाभाऊ कदम, माऊली इंदलकर, विनोद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सौरभ नागणे, राहुल नांगरे, समाधान नांगरे, सौदागर नांगरे, श्रीरंग कदम, विक्रम मिस्किन, वैभव चव्हाण, पवन चव्हाण, संतोष सलगर, लक्ष्मण मोटे,नगोरली चे युवक नेते अनिल पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा