. संपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : किनवट माहुर विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे संपर्क अभियान माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु असुन या अणुषंगाने सुमारे ४ ते ५ टीम ह्या संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढत आहेत. जिल्हा परिषद गट अनुसार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पधाधिकारी प्रत्येक गावात संपर्क साधण्यासाठी आपल्या सहका-यासोबत फिरत आहेत. मागील दोन महिण्यापासुन सुरु असलेले अभियान हे आपल्या अंतिम टप्प्यात असुन याला प्रचंड असे प्रतिसाद प्रत्येक ठीकाणावरुन मिळत आहेत.
या अभियानाव्दारे सक्रीय सदस्य व कार्यकारी सदस्या नोंदणी हि करण्यात येत असुन सुमारे ३० हजार कार्यकर्त्यांची नोंद करुन पक्षाला पाठवण्यात येणार असल्याचे कळले आहे. याकामी माजी आमदार प्रदिप नाईक हे स्वतः सर्वत्र संपर्क अभियान राबवित आहेत तर प्रकाश राठोड, दिनकर दहिफळे, अनिल पाटील, मधुकर राठोड, राहुल नाईक, बालाजी बामणे, अजित साबळे, बंटी जोमदे, प्रबोध राठोड, विशाल जाधव, गजानन मुंडे, शिवराम जाधव, कचरु जोशी, अशिष नाईक, प्रमोद राठोड, ञानेश्वर दहिफळे, संतोष बोईनवाड, पंडित राठोड, महेश तंबाखुवाला, यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी देखिल या अभियानाला यशस्वी करण्याकरिता अथक प्रयत्न करत आहेत.
या वेळी प्रत्येक गावामध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये अनेक नवयुवक राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. अशा प्रकारचे संपर्क अभियान हे आज डोंगरगाव येथे पोहचले असून येथील अबाल वृध्द व ज्येष्ठ नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यात वैजनाथ डाके, शिवाजी हुरदुके, भिमराव यरपे, तुकाराम साबळे, चरतरी वागतकर, पांडुरंग मेंडले, सय्यद जलाल, सुदाम वागतकर, सुनील डुरइकें, राजू मेंडके, शंकर धुमाळे, वसुदेव वागतकर, गोमाजी हुर्दुके, गजानन वीजमवार, दत्ता मेंढे, हरइके, गणपत बागलकर, बालाजी डाके, गजानन धनवे, ईश्वरदास, संतोष हुइके, देवजी ढोलें, अशोक डुरके, कपील डाके, रामू हुरुके, ज्ञानेश्वर मेंढे, नामदेव धनवे, सुरेश हुदूके, पंडीत घुमा, बाबुराव धुमाळे, दत्ता डाके, रामकिशन, ऋषिकेश, अंकोश दुर, आतिश बुरकूले, शिवाजी वाक्याने, रामू मेटकर, रवि हुदूक, बालाजी भिसे, गोविंद धनवे, सुरेश हुदूके, गजानन डाके, यशवंता वागतकर, गोविंद साबळे, माधव डवरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, माजी सभापती अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस अजित साबळे, गजानन सोळंके पाटील, बाळू पवार, श्यामराव गुरुजी, यांच्यासह इतर ही मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा