Breaking

मंगळवार, ७ मार्च, २०२३

माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची प्रत्येक गावात मधुमेह निदान तपासणी केली जाणार..... आमदार बबनदादा शिंदे


माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची प्रत्येक गावात मधुमेह निदान तपासणी केली जाणार..... आमदार बबनदादा शिंदे

 बेंबळे ।प्रतिनिधी।                  

                विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशिय सांस्कृतिक  मंडळ निमगाव टे. व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर, पिंपळनेर व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील पन्नास वर्षांपुढील स्त्री पुरुष नागरिकांची प्रत्येक गावात जाऊन रक्त  तपासणी करून मधुमेहाचे निदान करण्यात येणार असल्याची माहिती  साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.


                     अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकरी ,कष्टकरी, स्त्री पुरुष मजूर इत्यादी नागरिकांना आपणाला होत असलेल्या आजाराचे निदान तातडीने करण्याची सोय खेड्यापाड्यात उपलब्ध नसते, यामुळे तात्पुरते उपचार घेऊन असे नागरिक आपले दुखणे अंगावरच काढत असतात. नुकतेच माढा येथे झालेल्या मोतीबिंदू तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झालेल्या दीड हजार नागरिकांपैकी 15 ते 20 टक्के नागरिकांना प्रत्यक्ष तपासणी नंतर मधुमेह आजार असल्याचे निदर्शनास आले व त्यामुळे त्यांचे वर नेत्र शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचार करण्यासाठी थांबावे लागले. यामुळे आता विठ्ठलराव शिंदे बहुऊद्देशिय सांस्कृतिक  मंडळ, साखर कारखाना व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील 108 गावे व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावे व माळशिरस तालुक्यातील 14 गावातील पन्नास वर्षांपुढील नागरिकांची प्रत्यक्ष गावात जाऊन रक्त तपासून रक्तातील साखरेचे प्रमाण ठरवून मधुमेह निदान करण्यात येणार आहे, म्हणजे अशा नागरिकांना उपचार घेऊन मधुमेह नियंत्रणात आणणे सोपे जाईल. 
चौकट ....डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन 
         माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन रक्त तपासणी व मधुमेह निदान मोहीमेची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर, पिंपळनेर येथे मतदारसंघातील डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन करण्यात  आले आहे.
                    आमदार बबनदादा शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा