Breaking

गुरुवार, ३० मार्च, २०२३

बहुजन रयत परिषद, महिला प्रदेश अध्यक्षा सौ कोमल ताई साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप.



बहुजन रयत परिषद, महिला प्रदेश अध्यक्षा सौ कोमल ताई साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


बहुजन रयत परिषद महाराष्ट्राच्या वतीने व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला महाराष्ट्राची रणरागिणी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ कोमल ताई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.30/3/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय उमरगा जि धाराशिव येथे गोरगरीब रुग्णांना फळे व केळी बिस्किट रुग्णांना वाटप करण्यात आले व विविध उपक्रमानी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बालाजी माधवराव गायकवाड व लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक श्री दिलीपरावजी गायकवाड व राजाभाऊ शिंदे दलित महासंघ तालुका अध्यक्ष सुखदेव होळीकर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सचिव दीपक पात्रे कोंडीबा कोल्हे व महिला कार्यकर्त्या सौ गोजराबाई बनसोडे रूपाली रणदिवे रणदिवे ताई व कार्यकर्ते पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा