*मीरा फाउंडेशन चे काम समाजासाठी उपयोगी*
प्राचार्या सौ. एस. बी. पाटील.
विमलेश्वर विद्यालयात महिला दिनाच्या औचित्याने दंतचिकित्सा शिबिर संपन्न.
बेंबळे।प्रतीनीधी।
दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळे या ठिकाणी शालेय विद्यार्थी, शिक्षक यांचे साठी दंतचिकित्सा शिबिर आणि दंत सुरक्षा विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात पाटील म्हणाल्या की,
'महिला सन्मानाचा हा महिला दिन साजरा करण्यामागे अमेरिकेतील गिरणीमध्ये काम करणाऱ्या सुमारे पंधरा हजार महिलांनी त्यांच्या हक्का विषयी केलेल्या आंदोलनाचे फलित आहे.
आज कोणत्याही क्षेत्रामध्ये महिलांचे कर्तुत्व आणि नेतृत्व हे पुरुषांच्या बरोबरीत आहे. ग्रामीण शालेय विद्यार्थिनींनी मिळालेल्या शैक्षणिक संधीचा उपयोग करून उत्तम करिअर निर्माण करावे.
मीरा फाउंडेशनने या महिला दिनाच्या निमित्ताने दंत सुरक्षा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम घेऊन आणि दंतचिकित्सा करून योग्य काम केलेले आहे.'
याप्रसंगी दंतवैद्य डॉक्टर विशाल जाधव यांनी मार्गदर्शन केले की,
'लहान वयापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मौखिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दातांची स्वच्छता आणि दातांची निगा हे माणसाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. अन्नपचन आणि मानसिक आरोग्य यासाठी दातांचा थेट प्रभाव पडतो. दंत सुरक्षा ही काळाची गरज आहे.'
मीरा फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक मयूर काळे यांनी याप्रसंगी सांगितले की,
'मीरा फाउंडेशन गेली तीन वर्षे पासून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आणि अभियान राबवत असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका यावर हे फाउंडेशन विशेष काम करीत असून समाजातील गरिबातील गरीब व्यक्तीचा उत्कर्ष हे या फाउंडेशनचे ध्येय आहे. टेंभुर्णी सह माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांवर विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास करणे हे प्राधान्यक्रमाचा भाग आहे.'
याप्रसंगी संस्थेचे संचालक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीशन किर्ते यांनी केले तर प्रदर्शन लक्ष्मण भोसले यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा