कै. कृष्णात बोबडे यांचा वारसा जपणार भाजप माढा ता. अध्यक्ष योगेश बोबडे:
......... टेंभुर्णी प्रतिनिधी/गणेश चौगुले.........
टेंभुर्णी प्रतिनिधी:- टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालय समोर योगेश बोबडे यांच्या सन्मानार्थ कार्यकर्त्यांकडून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कै. कृष्णात बोबडे यांचे कार्य व कामाचा आवाका मोठा होता. ज्यांना कोणी वाली नाही अशा लोकांना ते प्राधान्य द्यायचे. त्यामुळे दादांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी केले. यावेळेस सन्मानास उत्तर देताना बोबडे म्हणाले की जिल्हा नियोजन समितीतून मार्गी लावलेले ६ कोटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सत्ताधाऱ्यांनी १५ वर्षात टेंभुर्णीचा विकास खुंटला आहे.१४,१५ व्या वित्त आयोगातून कुठल्यातरी बोळात पेव्हिंग ब्लॉक टाकले,५० मीटरचा रस्ता काँक्रीट केला तर फार मोठा निधी आणला विकास झाला असा त्यांचा समज झाला आहे, दलित वस्ती मधील ९५ लाखांचा निधी केवळ प्रस्ताव न दिल्यामुळे हा निधी पडून आहे, अशी टीकाही विरोधी गटावर केली. यावेळी रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संजय कोकाटे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नागनाथ वाघे, राजाभाऊ खटके, विनोद शिंदे, विजय कोकाटे, राजू पाटील, विकास धोत्रे, विनायक लोंढे, जयवंत पोळ यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास बंकट देशमुख, दमन सपाटे, दशरथ देशमुख, राजाभाऊ थोरात, बलभीम लोंढे, पांडुरंग पाटील, जयसिंग ढवळे, युसूफ रास्तापुरे, संजय देशमुख, संतोष तांबे, उमेश पाटील,अतुल खुपसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बोबडे गटाचे ग्रामपंचायत सदस्य, सर्व जेष्ट मंडळी व तरुण युवकांनी केले होते. सूत्रसंचालन राजेंद्र मुळे, राजाभाऊ पाटील यांनी केले तर आभार बंकट देशमुख यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा