रस्ता अपघातात एका वृध्द महिलेचा मृत्यू, चालकाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
नळदुर्ग पोलीस ठाणे : नंदगाव, ता. तुळजापूर येथील- शालाबाई काशिनाथ चौगुले, वय 70 वर्षे, हे दि. 26.03.2023 रोजी 17.30 वा. सु. जळकोट ते तुळजापूर एन एच 65 हैद्राबाद रोडवर नंदगाव मोड येथे रस्त्याने पायी जात होते. दरम्यान स्विफट डिझायर कार क्रं एमएच 12 क्युजी 9201 चा चालक नामे जगन्नाथ मारुती बालकुंदे रा. रिकटवाडी हवेली खडकवासला पुणे यांनी त्यांच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने शालाबाई यांना साईडने धडक दिली. या अपघातात शालाबाई ह्या गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- चितानंद काशीनाथ चौगुले यांनी दि.28.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा