बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग उभा करावेत ~ बिचुकले
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करावेत त्यासाठी राष्ट्रीय महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल तसेच गरजू महिलांनी बचत गटांचा वापर योग्य पद्धतीने करावा असे आवाहन प्रभाग समन्वयक सुषमा बिचुकले यांनी केले. त्या रांझणी तालुका माढा येथे महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या आयोजन सावित्रीबाई फुले ग्रामसंघ रांझणी यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून सुरूवात करण्यात आली.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी एकत्रित येत गटस्थापना करावी त्यासाठी गटांना महिला स्वयंसहायता उद्योग वाढीस प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले ग्रामसंघ या गटाच्या माध्यमातून संगीत खुर्ची, उखाणे, किशोरवयीन मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच कर्तुत्वान महिलांसाठी पारितोषिक वितरण आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.
यावेळी सुषमा बिचुकले,नेहा देशमुख, सीआरपी बशीरा मुलाणी, संगीता पाटोळे, सावित्रीबाई ग्रामसंघ रांझणी संघाचे अध्यक्षा काजल सरवदे,सचिव रेखा चव्हाण, कोषाध्यक्ष रूपाली जाधव,लिपिका अर्चना चव्हाण तसेच रांझणीतील सर्व गटातील अध्यक्षा, सचिव ,सदस्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा माने यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकिता चव्हाण यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा