Breaking

रविवार, २ एप्रिल, २०२३

जिल्हा बँकेच्या ओटीस कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ मिळणेबाबतआ.बबनराव शिंदे यांची बँकेच्या प्रशासकाकडे मागणी



जिल्हा बँकेच्या ओटीस कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ मिळणेबाबत
आ.बबनराव शिंदे यांची बँकेच्या प्रशासकाकडे मागणी



 
AJ 24Taas News Maharashtra साठी -बेंबळे प्रतिनिधी मुकुंद रामदासी

सोलापूर जिल्हा मध्य सह बँक लि.सोलापूर या बँकेच्या वंचित शेतकरी सभासदांना एकरक्कमी (ओ.टी.एस.) कर्ज परतफेडीचा लाभ मिळण्यासाठी ओटीएसला मुदतवाढ देणेबाबतची मागणी आ.बबनराव शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासक यांचेकडे केली आहे.

सोलापूर जिल्हा मध्य सह बँक लि.सोलापूर या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना डाळींब,केळी,द्राक्ष,ऊस व इतर पिके व फळबाग लागवडीसाठी मागणीनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा बँक शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा असून बँकेने जिल्ह्यातील शेतक-यांसाठी नेहमी सहकार्याची भुमिका मांडलेली आहे. सोलापूर जिल्हा बँकेने सध्या सभासदांना कर्जाची थकबाकी भरताना सवलत देण्याचे भुमिकेतून ओ.टी.एस.(एकरक्कमी) कर्ज परतफेड योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेंतर्गत सभासद शेतक-यांना एकरक्कमी कर्ज परतफेडीची सवलत देण्यात आलेली असून त्याची मुदत 31 मार्च अखेर होती.

जिल्ह्यातील सभासद शेतक-यांना दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकास  हमीभाव नसल्याने व इतर कारणांमुळे बँकेच्या धोरणाप्रमाणे 31 मार्च पर्यंत ओटीएस रक्कम बँकेकडे भरणा करणे शक्य झालेले नाही. तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपलेले असून ब-याच साखर कारखान्यांनी ऊस पुरवठादार शेतक-यांना ऊसाची बिले अद्याप पर्यंत दिलेली नाहीत. ऊसाची बिले न मिळाल्यामुळेही शेतक-यांना बँकेची ओटीएस रक्कम भरणा करता आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या ओटीएस योजनेपासून वंचित राहीलेले आहेत. या योजनेस मुदत वाढ दिल्यास शेतकरी या योजनेंतर्गत ओटीएस रक्कम जिल्ह्या बँकेकडे भरू शकणार आहेत व कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही. तसेच बँकेच्या थकबाकी कर्जाची वसुली होण्यास मदत होणार आहे.

 
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना या ओटीएस योजनेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेस मुदतवाढ मिळणेबाबत जिल्हा बँकेच्या प्रशासक यांचेकडे पत्राद्वारे विनंती केली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा