Breaking

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न.



तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर येथील माझा आनंद प्रतिष्ठान आणि वरदायिनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यानिमित्त दिनांक 27/4 2023 रोजी आनंद बुद्ध विहार आनंदनगर हाडको येथे शिबिर संपन्न झाले या शिबिराची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व बौद्ध वंदना घेऊन  उद्घघाटन  करण्यात आले उद्घघाटन प्रसंगी उद्घघाटक म्हणून तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अजिनाथ काशीद साहेब यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थितीमध्ये वरदायिनी हॉस्पिटलचे ट्रस्टी श्री विशाल भैया रोचकरी, भारतीय बौद्ध महासभेचे विश्वास भाऊ पांडागळे, देविदास कदम, अप्सराताई कदम, राजश्रीताई कदम, बाळासाहेब कदम, प्रताप कदम, आनंद पांडागळे, दिनेश क्षीरसागर, प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर, दुर्गेश साळुंखे,   
बाळासाहेब मुळे,जीवन कदम,डॉ अजिंक्य वडगणे, धनंजय मुळे सर,नमिता डावखरे हे उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रस्ताविकात भूमिका विशद करताना माझा आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश अण्णा क्षीरसागर यांनी सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो या लोकभावनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग यावा लागतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने हा योग आला आहे असे सांगितले
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विशाल भैया रोचकरी यांनी सांगितले की मोफत आरोग्य शिबिर घेणे ही काळाची गरज आहे अशा उपक्रमांना माझे यापुढेही सहकार्य राहील कार्यक्रमात बोलताना अजिनाथ काशीद साहेब म्हणाले की महामानवांची जयंती साजरी  करताना त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले तर महामानवांना खरी आदरांजली ठरेल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन माझा आनंद प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते यामध्ये मोठ्या गटात आकाश कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कुमारी यशस्विनी गोवर्धन माने हिने मिळवला छोट्या गटात प्रथम क्रमांक आर्या वैभव पांडागळे द्वितीय क्रमांक हर्ष विजय चौधरी तर तृतीय क्रमांक शिवानी शैलेश कदम हिने तर उत्तेजनार्थ क्रमांक आर्यन कदम यांनी पटकावला मान्यवरांच्या हस्ते सर्वांना आनंद चषक आणि शालेय साहित्य देण्यात आले तसेच माझा आनंद प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधानाची फोटो फ्रेम आनंद विहारास भेट देण्यात आली. यानंतर शिबिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. यामध्ये BP,शुगर,   ऑक्सिजन लेवल हिमोग्लोबिन CBC तसेच ECG तपासणी  व इतर तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये जवळजवळ 200 पुरुष महिला यांनी नोंदणी करून शिबिराचा  लाभ घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ प्रा शिवाजी जेटीथोर यांनी केले या शिबिर प्रसंगी शीतपेय आणि अल्पउपहार ची सोय करण्यात आली होती शिबिराच्या यशस्वीतेसाठी माझा आनंद प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शुभम कदम,सूरज गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा