आ.विक्रम काळे यांच्या स्थानिक निधीतून ७३ शाळांना ग्रंथ वाटप
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : पंचायत समिती येथील सभागृहामध्ये मराठवाडयाचे लढवय्ये शिक्षक आमदार मा. विक्रम काळे यांच्या स्थानिक निधीतून किनवट माहूर तालूक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा व वरिष्ठ महाविद्यालय अशा ७३ शाळांना पुस्तक वितरण करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवान करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदिप नाईक हे हेाते.
यावेळी गटविकास अधिकारी पुरूषोत्तम वैष्णव गटशिक्षणाधिकारी किनवट ज्ञानोबा बने गटशिक्षणाधिकारी माहूर आर.आर.जाधव,प्रा.राजेंद्र केशवे,वैजनाथ करपुढे पाटील, अनिल पाटील कऱ्हाळे,अँड.सचिन राठोड,प्रा. अनिल पाटील,अरविंद राठोड, प्रा.दगडू भरकड प्रा.गव्हाणे,प्रा.भगवानराव जोगदंड,सुरेश सोळंके पाटील, प्रा.विजय खुपसे,उत्तम कानिंदे,विनायक गव्हाणे बालाजी सिरसाट आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा