Breaking

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

अमृता चव्हाण यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियात कृषी अधिकारीपदी निवड


अमृता चव्हाण यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियात कृषी अधिकारीपदी निवड


बेंबळे। प्रतिनिधी।                         

                        लहू ता.माढा येथील अमृता भाऊसाहेब चव्हाण यांची आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून सेंट्रल बँक ऑफ इंडियात वर्ग १ च्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. बी. एस्सी अ‍ॅग्रीच्या शिक्षणानंतर अमृता चव्हाण यांनी आयबीपीएस ची परीक्षा दिली. यातून त्यांची कृषी अधिकारी पदी निवड झाली. अमृता चव्हाण यांचे वडील भाऊसाहेब चव्हाण प्राथमिक शिक्षक असून आई कविता भाऊसाहेब चव्हाण या गृहिणी आहेत. अमृताच्या यशाबद्दल पं.स.चे गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख महादेव जठार, सिमिंता कुंभार, संजय काशिद, महादेव चव्हाण,चंद्रकला नागणे, महादेव जठार,कर्मवीर चव्हाण, विद्या मारकड, मंजू चव्हाण यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल अमृताचे सर्वत्र कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा