Breaking

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

सौ रतन विलास रणवरे यांचे निधन....शुक्रवारी सकाळी हडपसर-पुणे स्मशानभूमीत होणार अंत्यविधी.....निमगाव (टे.) येथील शिंदे कुटुंबीयांना शोक....



बेंबळे।प्रतिनिधी।                   

आमदार बबनदादा विठ्ठलराव शिंदे ,आमदार संजयमामा विठ्ठल राव शिंदे व  रमेशमालक विठ्ठलराव शिंदे यांच्या भगिनी व डॉक्टर विलास रणवरे ,टेंभुर्णी, यांच्या धर्मपत्नी सौ. रतन विलास रणवरे यांचे बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले त्या 67 वर्षाच्या होत्या, त्यांचे पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.  शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजता हडपसर पुणे येथील स्मशानभूमीत स्वर्गीय रतनताई
रणवरे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे निमगाव( टे.) येथील शिंदे कुटुंबीयांच्याकडून कळवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा