Breaking

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

माढा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास शासनाची प्रशासकीय मान्यता...... आमदार बबनराव शिंदे



माढा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास शासनाची  प्रशासकीय मान्यता......  आमदार बबनराव शिंदे


 बेंबळे। प्रतिनिधी                        

   सोलापूर जिल्ह्यात, माढा येथे दिवाणी न्यायालयास (वरिष्ठ स्तर) राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


     विशेष वृत्तांत असा की गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मान्यता मिळावी यासाठी आमदार बबनराव शिंदे प्रयत्नशील होते माढा बार असोसिएशनची देखील मागणी होती अखेरीस माढ्यातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
   यासंदर्भात राज्य सरकारने तसा शासन निर्णय काढला असुन माढ्या बरोबरच बीड जिल्ह्यातील केज येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथेही जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीतुन खर्च करण्यात यावा असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा