Breaking

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

नायब तहसीलदार,तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप मागे.

नायब तहसीलदार,तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप मागे.
मुंबई (मिलिंद माने)_ग्रेड पे वाढवण्यासंदर्भात राज्यभरात काम बंद आंदोलन गेली काही दिवस पुकारलेल्या नायब तहसीलदार यांच्या संपात गुरुवारी अखेर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने त्यांनी आज आपला संप मागे घेतल्याची घोषणा केली.

काल बुधवारी महसूल मंत्री विखे पाटील यांनी संपाची दखल घेऊन संघटनेशी चर्चा केली होती. नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी ४८०० रुपये करण्याची संघटनेची मागणी रास्त असल्याचे सांगत स्वतः मंत्री महसूल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यशी प्रदीर्घ चर्चा केली.त्यानंतर विखे पाटील यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पुन्हा मंत्रालयात चर्चेसाठी पाचारण करून या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगत काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शवत संप मागे घेतल्याची घोषणा केली.

आज घेतलेल्या निर्णयानुसार आजच त्याला वित्त विभागाची मंजुरी मिळून घेतली. व ग्रेड पे देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
...............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा