ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठेकेदार मुकादमावर पोलीस कारवाई होणार....
आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नाला यश...
बेंबळे ।प्रतिनिधी
साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालक वाहतूकदारांची ऊस तोडणीसाठी मजूर पुरवणाऱ्या ठेकेदार-मुकादमांनी आर्थिक फसवणूक केल्यास संबंधित मुकादामावर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधित पोलीस स्टेशन कडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्वत्र जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकास दुजोरा देऊन सोलापूर जिल्ह्यात याबाबतीत गंभीर दखल घेऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमांच्यावरती निश्चित कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन सोलापूरचे पोलीस अधीक्षक ग्रामीण विभाग सरदेशपांडे शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
याबाबतीत आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील जिल्ह्यात आणि राज्यात आवाज उठवला होता आणि डिसेंबर 20 22 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडुन शासनाचे लक्ष वेधले होते, त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले असून राज्यातील सर्व साखर कारखान्याकडील ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वृत्तांत असा की मागील काही वर्षात ऊस वाहतूक दाराकडून ऊस तोडणी मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमांनी लाखो रुपये घेऊन तोडणी मजूर पुरवठा न करता आर्थिक फसवणूक करून वाहतूकदार वाहन मालकांना देशोधडीला लावले आहे, एका वर्षातील सोलापूर जिल्ह्यातील ही फसवणुकीची रक्कम 125 कोटी₹ पर्यंत आहे. वाहतूकदाराने मुकादामाचा शोध घेऊन त्याला पैसे मागणी करताच हे मुकादम लोक मजुरांच्या साह्याने ॲट्रॉसिटी, विनयभंग ,फसवणूक असे खोटे गुन्हे दाखल करून या वाहन मालकांना अडचणी आणले आहे.
या सर्व प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन , कार्यकारी संचालक व शेतकी अधिकारी यांच्या एका खास बैठकीचे ऑक्टोबर 20 22 मध्ये आयोजन करून या सर्व आर्थिक फसवणुकीची शासनाने चौकशी करावी व वाहतूकदार शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासंबंधीची अधिसूचना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2022 मध्ये मांडली होती. यामध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांची मुले जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात ,परंतु त्यांना मजूर टोळ्या आणण्यासाठी घरातील सोने -नाणे गहाण ठेवून व व्याजाने पैसे काढून लाखो रुपये मुकादमांंना द्यावे लागतात व हे मुकदम मजूर न पुरवताच चक्क आर्थिक फसवणूक करून वाहतूकदारावरतीच खोटे गुन्हे दाखल करतात, याचे पुरावे माढा तालुक्यात उपलब्ध आहेत., प्रसंगी मजूर टोळ्या आणण्यास गेलेल्या संबंधित वाहन मालकाची लुबाडणूक करून अशा लोकांनी त्याचा खून केला आहे., याचीही चौकशी व्हावी व गुन्हेगारांना पकडून आणावे आणि त्यांना शासन व्हावे.
... गुन्हे दाखल करा...
आ.बबनदादा शिंदे। फोटो
ज्या शेतकऱ्यांची, वाहन मालकांची यापूर्वी मजूर ठेकेदार मुकादमानी आर्थिक फसवणूक केली आहे त्यांचे वरती संबंधित वाहन मालकांनी नोटरी पेपर्स करार स्टॅम्प पेपर्स आदी संबंधित कागदपत्रे दाखवून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत, पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व चौकशी करून संबंधित ठेकेदार व मजुरांना आणून त्यांचे वर कारवाई केली जावी. कांही मुकादमानी पैसे परत देणे म्हणून शेतकऱ्यांना बँकेचे चेक दिले पण ते चेक देखील बँकेत वाटले नसून 'बाऊन्स' झाले आहेत, या प्रकरणी देखील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून घ्यावेत व न्यायालयामार्फत चौकशी व्हावी, अशी ही मागणी आ. बबन दादांनी केली आहे.
गुन्हेगारावर कारवाई होईल.....
पोलीस महासंचालन कार्यालय मुंबई यांचेकडून ऊस वाहतूकदारांची मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार मुकादम कडून आर्थिक फसवणूकी बद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून घेण्यात येतील व अशा प्रकरणांची सखोल चौकशी होऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शिरीष सरदेशपांडे
पोलीस अधीक्षक ग्रामीण विभाग सोलापूर धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा