हर्षदा मडके हीची भुकरमापकपदी निवड झाल्याबद्दल बबनराव शिंदे सोसायटी तर्फे सन्मान
टेंभुर्णी प्रतिनिधी: हर्षदा जगन्नाथ मडके हिची भुमी अभिलेख विभागात भूकरमापक पदी सरळ सेवा भरती प्रक्रियेतून निवड झाल्याबद्दल सन्मान बबनराव शिंदे सोसायटीचे चेअरमन अशोक मिस्कींन यांच्या हस्ते करण्यात आला.
हर्षदा ही पहिल्यापासून अभ्यासामध्ये हुशार होती. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी नगर टेंभुर्णी, माध्यमिक शिक्षण श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर, उच्च माध्यमिक शिक्षण एसपी कॉलेज पुणे तसेच पदवीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे सिविल इंजिनिअर या शाखेतून झाले आहे. हर्षदाचे वडील जगन्नाथ मडके यांचे मेन रोड टेंभुर्णी येथे इलेक्ट्रिकचे छोटेसे दुकान आहे वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तिने अभ्यासामध्ये उत्तुंग अशी भरारी मारली आहे. तिचे टेंभुर्णी व पंचक्रोशी मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
चव्हाणवाडी सोसायटीचे चेअरमन अशोक मिस्कीन यांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी सत्कार करताना भारत जगताप, सुनील मिस्कीन, अजित मिस्कीन, धुमाळ व जगन्नाथ मडके इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा