Breaking

शनिवार, २० मे, २०२३

तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवकन्या बिराजदार विजयी.



तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवकन्या बिराजदार विजयी.




प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत थेट सरपंच पदासाठी दि,१८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर शुक्रवारी दि,१९ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये बळीराजा ग्रामविकास पॅनलच्या शिवकन्या बिराजदार यांनी 159 मते अधिक  मिळवुन विजयी ठरले आहेत,तर  प्रतिस्पर्धी ग्राम विकास पॅनलच्या सरोजाबाई शिंदे यांना 877 मतावर समाधान मानावे लागले आहे . या विजयाबद्दल बळीराजा ग्राम विकास पॅनलच्या कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक विठ्ठल होगाडे, उपसरपंच लक्ष्‍मण लबडे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेंढापुरे ,पिंटू बिराजदार, युवा नेते सचिन बिराजदार, पोलीस नाईक अमोल मंकराज ,राजेंद्र शिंदे, प्रभाकर बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम देशमुख, नीलकंठ स्वामी, दीपक पाटील ,भीमा देडे, शंकर बिराजदार ,शिवराम बिराजदार,  किसन शिंदे, प्रकाश राजमाने आधी सह ग्रामस्थ उपस्थित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा