Breaking

गुरुवार, ४ मे, २०२३

कार्यकर्त्यांच्या जीवावरच मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकतर्फी विजय - आमदार संजयमामा शिंदे .


कार्यकर्त्यांच्या जीवावरच मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकतर्फी विजय  - आमदार संजयमामा शिंदे .


कन्हेरगाव दि प्रतिनिधी

  कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ,गावागावातील कार्यकर्त्यांच्या जीवावरच आजचा सर्वच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. ते विजयी उमेदवारांच्या भेटी प्रसंगी बोलत होते. 
    आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव टें तालुका माढा येथील निवासस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयी झालेल्या सर्व संचालकांनी आमदार शिंदे यांची भेट घेऊन सत्कार केला . 
            ते पुढे बोलताना म्हणाले की,आम्ही शिंदे बंधू कायम जनतेच्या संपर्कात असल्याने आम्हाला मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. ही निवडणूक बिनविरोध होत असताना विरोधकांनी प्रतिष्ठेची केली होती परंतु या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांची जागा त्यांना दाखवून दिली आहे यापुढेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सोडणार असुन आम्ही केलेल्या कामाची पोचपावती माढा तालुक्यातील सर्व मतदारांनी आम्हाला मतदान रुपी दिलेली आहे.
             यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा.चेअरमन सुहास पाटील , रमेश पाटील , दिलीपराव भोसले , शिवाजी पाटील , धनंजय मोरे , नागेश खटके , उत्कर्ष देशमुख , किसन पाटील , अमोल देवकर  ,विजयकुमार लोंढे , नागनाथ पाटील , पोपट दोभाडा , संतोष अनभुले , सतीश सुर्वे  ,सुरेश बागल  ,हनुमंत पाडुळे रामभाऊ वाघमारे हे सर्व संचालक उपस्थित होते.
          कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैय्या शिंदे,सभापती विक्रमदादा शिंदे, माढा फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे ,निमगाव येथे सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा