स्त्रीशक्ती महिला मंडळाकडून वृक्षरोपण
टेंभुर्णी प्रतिनिधी :-वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती
या उक्तीप्रमाणे कै.सुशीलाबाई पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित , स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शीलाताई भारत पाटील व त्यांच्या महिला मंडळांनी १८ जून२०२३ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांमध्ये त्यांना वृक्ष लागवड व वृक्ष वाचवण्याच्या कार्यक्रमात नेहमी सहभाग असणाऱ्या शुभम नर्सरीची मालकीण अर्चना दादासाहेब रेडे-पाटील यांनी त्यांच्या नर्सरी मार्फत केशर आंबा, चाफा, मोगरा, पेरू, जास्वंद अशा विविध प्रकारची मोफत झाडे दिली. स्त्री शक्ती महिला मंडळाच्या महिलांनी सुषमा टकले मॅडम यांच्या घरी व रजाबाई खुळे यांच्या वस्तीवरील चार ते पाच घरी जाऊन वृक्षाची लागवड केली. यावेळी स्त्रीशक्ती महिला मंडळाचे उपाध्यक्ष सुवर्णा भोसले, सचिव सविता जगताप मॅडम, शीलाताई गायकवाड, प्रभावती यादव, सुनीता सोनवणे, सुषमा टकले मॅडम, वर्षा पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा