राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याने कारवाईची मागणी.....
श्रीगोंदा-नितीन रोही
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांना सोशल मीडियावर "तुझा दाभोळकर करू" अशी जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तहसीलदार यांना आरोपीला तात्काळ अटक करावे असे निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 9 जून रोजी ट्विटर वर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना शिवीगाळ व तुझा लवकरच दाभोळकर होणारे अशी धमकी आली आहे.त्यामुळे पवारांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकार व पोलीस खात्याने यात लक्ष घालून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी तसेच त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा यासंदर्भात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी दिला आहे...यावेळी आर पी आय चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष गोरख घोडके,राष्ट्रवादी सेवादलचे तालुकाध्यक्ष शाम जरे,शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे,युवा नेते शिवा घोडके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा