*कान्हापुरी येथील चंद्रकांत पवार खून प्रकरणी तिघांना अटक 31जूलै पर्यंत पोलीस कोठडी*
टेंभुर्णी प्रतिनिधी : - कामाचे पैसे मागितल्याचा राग अनावर झाल्याने तिघांनी मिळून दगडाने व हाताने मारून महिन्यांपूर्वी खून केलेल्या चंद्रकांत उर्फ अधिक बाबा पवार (वय-४२)रा.कान्हापुरी ता.पंढरपूर याच्या खून प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून तिघांना ३१ जुलै पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली
.
या गुन्ह्यातील अतुल गोरख मुटेकर (वय-४३) रा.वाफेगाव ता.माळशिरस,कामगार मच्छिंद्र तारू भिल (वय-३३),भीमराव आनंदा भिल (वय-३७)दोघे
रा.उमरटी,ता.चोपडा,जि.जळगाव हल्ली रा.चव्हाणवस्ती कान्हापुरी, ता.पंढरपूर अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत टेंभुर्णी परिसराकडून मिळालेली माहिती अधिक अशी की,२० जून रोजी सकाळी ९ वा.टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील अकोले बुद्रुक गावच्या शिवारात बेंबळे रस्त्यावर पोपट पांडुरंग काळे यांच्या ऊस पिकात रस्त्याच्या कडेला चंद्रकांत उर्फ अधिक बाबा पवार (वय-४२) रा.कान्हापुरी ता.पंढरपूर याचा बेवारस मृतदेह टेंभुर्णी पोलिसांना मिळून आला होता.टेंभुर्णी पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू ठेवला होता.याबाबत पोसई संदेश चंदनशिव यांनी फिर्याद दिली होती.
त्यानंतर त्यांचा शवविच्छेदन अहवाला आला.त्यामध्ये त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा खोलवर असल्याने व डोक्यातील मोठी जखम ही पडून झालेली नसल्याचा अहवाल आला होता.
या अहवालाची माहिती घेऊन नूतन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने मीटिंग घेऊन खास तपासासाठी एक पथक नेमून तपासाचे चक्र फिरवली व त्यामध्ये पोलिसांना ही घातपाताचा संशय बळावला .यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील,पोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संदेश चंदनशिव,पोहेकॉ विलास नलवडे,पोना संदीप गिरमकर,पोना विनोद साठे,पोकॉ तुकाराम माने-देशमुख,पोकॉ अक्षय कांबळे,पोकॉ अतुल लवळे,पो.इंगोले पथकाने कान्हापुरी,वाफेगाव,बेंबळे अकोले बुद्रुक आदी ठिकाणी जाऊन गुप्त माहिती घेतली.यावेळी त्यांना चंद्रकांत पवार यांच्या खून प्रकरणी धागे दोरे मिळाले.यावरून तिघांना अटक केली आहे.
चंद्रकांत उर्फ अधिक बाबा पवार,मच्छिंद्र तारू व भीमराव भिल हे वाफेगाव येथे अतुल गोरख मुटेकर यांच्या घरी पत्रे ठोकण्याच्या कामावर गेले होते.यावेळी १९ जून रोजी चंद्रकांत पवार याने अतुल मुटेकर यास पत्रे ठोकण्याचे पैसे मागितले होते.ते त्याने दिले नव्हते.तसेच पवार याने पैसे मगितल्याचा अतुल मुटेकर यास राग आला होता.केवळ पैसे मगितल्याचा राग आला होता.यानंतर ते सर्वजण दोन मोटार सायकल वरून बेंबळे येथे येत होते.यावेळी चंद्रकांत पवार यांचे अतुल मुटेकर बरोबर भांडण झाले.केवळ याच भांडणावरून तिघांनी संगनमत करून चंद्रकांत उर्फ अधिक बाबा पवार यांचा काटा काढण्यासाठी अकोले बु.गावच्या शिवारात नेऊन तिघांनी हाताने,लाथा बुक्क्याने व डोक्यात दगडाने मारून खून केला.तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह उसाच्या शेतात रस्त्याकडेला फेकून दिला.नंतर सर्वजण आपापल्या घरी गेले असे तपासत समोर आले आहे.या गुन्ह्याची आरोपींची कबुली दिली आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपीना माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा