विठ्ठलराव शिंदे कारखाना एफ.आर.पी. पेक्षा 50/- रूपये जादा देणार
कारखान्यामार्फत 97 टक्के एफ.आर.पी. अदा
फेब्रुवारी व मार्च मधील गाळप झालेल्या ऊसास एफ.आर.पी.पेक्षा 75/- व 150/- अदा-आ.बबनराव शिंदे
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे ऊस गाळप हंगाम 2022-23 मध्ये शुगर केन कंट्रोल ऑर्डर प्रमाणे ऊस बिल घेणेबाबत ऊस पुरवठादार शेतक-यांशी झालेल्या करारानुसार आजअखेर 97 टक्के एफ.आर.पी. ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा केली आहे. या हंगामात प्र.मे.टन रू.2700/- प्रमाणे ऊस देणार असून एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन 50/- जादा देणार असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2022-23 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर येथे विक्रमी 18 लाख 41 हजार 420 मे.टन गाळप करून 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केलेल आहे. साखर उतारा 11.33 टक्के मिळालेला आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 5 लाख 28 हजार 285 मे.टन गाळप करून 5 लाख 22 हजार 745 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. साखर उतारा 11.37 टक्के मिळालेला आहे.
केंद्रशासनाचे धोरणानुसार सन 2022-23 साठी युनिट नं.1 पिंपळनेर व युनिटन नं.2 येथील येथील एकूण एफ.आर.पी. अनुक्रमे रू.2650.98 व रू.2652.28 होत आहे. शुगर केन कंन्ट्रोल ऑर्डर मधील तरतुदीनुसार एफ.आर.पी. रक्कम घेणेबाबत ऊस पुरवठादार शेतक-यांशी करार झाल्यास त्याप्रमाणे एफ.आर.पी. देता येणार आहे. त्यानुसार ऊस पुरवठादार शेतक-यांशी करार करण्यात आलेले आहेत. या गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 व 2 कडे गाळपास आलेल्या ऊसासाठी ऊस पुरवठादार शेतक-यांना पहिला ॲडव्हान्स हप्ता प्र.मे.टन रू.2350/- व दुसरा ॲडव्हान्स हप्ता प्र.मे.टन रू.200/-प्रमाणे असे आजअखेर एकूण प्र.मे.टन रू.2550/- प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना मिळालेले आहे. ऊस पुरवठादार शेतक-यांशी झालेल्या करारानुसार 97 टक्के इतकी एफ.आर.पी. रक्कम कारखान्याने अदा केलेली आहे. मागील सन 2021-22 व 2022-23 हंगामात गाळप झालेल्या ऊसास शेतक-यांना 10 दिवसाला ऊस बिल पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे एकमेव कारखाना आहे.
तसेच या हंगामामध्ये 16 ते 28 फेब्रुवारी,2023 या कालावधीमध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन रू.75/- व 1 मार्च ते हंगाम अखेर गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ.आर.पी. पेक्षा प्रति टन रू.150/- प्रमाणे जादा रक्कम अदा केलेली आहे. कारखान्याने फेब्रुवारी व मार्चमध्ये गाळप झालेल्या ऊसासाठी एफ.आर.पी.पेक्षा जादा रक्कम अदा केली असून जादा रक्कमेपोटी कारखान्याने एकूण रू.3 कोटी 78 लाख 62 हजार 925 अदा केलेले आहेत. तसेच या हंगामातील संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले व कमिशन डिपॉझीट रक्कम ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांना अदा करण्यात आली आहेत.
ऊस गाळप हंगाम 2023-24 साठी ऊस तोडणी वाहतूकीचे करार करणेची कार्यवाही सुरू असून करार केलेल्या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना कारखाना धोरणानुसार ॲडव्हान्स अदा करण्यात आलेला आहे व पुढील हप्ते धोरणानुसार अदा करीत आहोत. प्रतिवर्षी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद,बिगर सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे सातत्याने सहकार्य लाभलेले आहे. तरी ऊस पुरवठादार शेतक-यांनी 2023-24 साठी ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे देवून संपूर्ण ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी याप्रसंगी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा