*आ.बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 7 कोटी निधी मंजूर.*
आ.बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध रस्त्यांचे कामासाठी जुलै,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 7 कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 5 रस्त्यांचा व माळशिरस तालुक्यातील 2 रस्ता अशा एकुण 7 रस्त्यांचा दुरुस्ती व सुधारणा करणेसाठी निधी मंजूर झाला आहे.
याबाबत आ.शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचेकडे प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. आ.शिंदे यांनी केलेल्या शिफारसीनुसार माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध रस्त्यांचे कामासाठी जुलै,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 7 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पुरवणी अर्थसंकल्पात पंढरपूर तालुक्यातील (1) तुंगत ते कोळेकर वस्ती,मगर वस्ती रस्ता - 1 कोटी, (2) बार्डी ते भोसे रस्ता - 1 कोटी, (3) बेंबळे ते कान्हापूरी रस्ता - 1 कोटी, (4) शेगांव ते देगांव रस्ता - 1 कोटी, (5) शेवते,खळगेवस्ती-पवार वस्ती खेडभोसे रस्ता-1 कोटी तसेच माळशिरस तालुक्यातील 1) विठ्ठलवाडी ते खाटमोडे वस्ती रस्ता- 65 लाख. 2) वाफेगांव ते बेंबळे रस्ता - 1 कोटी 35 लाख असा एकुण 7 कोटी निधी मंजूर झालेला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी मिळणेसाठी आ.बबनराव शिंदे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामामुळे वाड्यावस्त्या या गावांना, मुख्य रस्त्यांना जोडली जाणार असुन त्यामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा