महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र
टेंभुर्णी प्रतिनिधी :- माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील प्रतीक माने यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र टेंभुर्णीतील कार्यक्रमात महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व भारतीय जनता पार्टीचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .
यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते- पाटील, सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार . सचिन कल्याण शेट्टी, माढा तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे, भाजपा टेंभुर्णी शहराध्यक्ष नागनाथ वाघे,युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश देशमुख, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस गिरीष ताबे आदी उपस्थित होते. भविष्यकाळात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय-धोरणे, केंद्रशासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून भाजपा पक्षाचे काम प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाचे टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष प्रतिक माने यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा