Breaking

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रोलर पुजन संपन्न



श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रोलर पुजन संपन्न 


जेऊर प्रतिनिधी 
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रोलर पुजन कार्यक्रम उत्साहात  संपन्न झाला. 
यावेळी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते रोलर पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्रशासक व तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था (साखर ) चे बाळासाहेब किसनराव बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रशासक मंडळाचे सदस्य महेश नृसिंह चिवटे तसेच प्रशासक मंडळाचे सदस्य व स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष संजय मनोहर गुटाळ, आदिनाथ चे कार्यकारी संचालक अरुण दिनकर बागनवर, मुख्य रसायनतज्ञ ए. आर. खाडे, मुख्य अभियंता के. आर. पाटील, उपअभियंता डी. डी. देशमुख, मुख्य शेती अधिकारी एस. आर. शिंदे, मुख्य अकाउंटंट एस.टी. पोळ, उप अकाउंटंट एस. एन. बोराडे, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कदम आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रोलर पुजना नंतर  पृथ्वीराज सावंत म्हणाले की, आदिनाथ कारखाना चांगल्या प्रकारे चालावा यासाठी भैरवनाथ शुगर ग्रुप तर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. 2023 -24 हा हंगाम चालू करण्यासाठी लागणारे सर्व आर्थिक सहाय्य भैरवनाथ ग्रूप करणार आहे .
यावेळी आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालण्यासाठी ऊस उत्पादक सभासद, ऊसतोड वाहतूक ठेकेदार, व कर्मचाऱ्यांनी आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगाम यशस्वीपणे चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन स्वाभिमांचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ चे प्रशासकीय मंडळाचे सदस्य संजय गुटाळ यांनी यावेळी केले.
कारखान्याचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी युध्द पातळीवर कामकाज चालू आहे.  येत्या 23 सप्टेंबर पर्यंत कारखान्याचे सर्व काम पूर्ण होत असून हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने युध्द पातळीवर कामकाज चालू आहे. कर्मचाऱ्यांना वेळच्यावेळी पगार देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती  कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी यावेळी दिली आहे. यावेळी  स्थापत्य अभियंता एस. के. अभंग ,खरेदी अधिकारी  यु.एच.पाटील, भाडारंरपाल,एस.व्ही.काकडे तसेच सुरक्षा अधिकारी एस. जी.  अनारसे आदी मान्यवर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक कार्यकारी संचालक अरुण बागनावर यांनी केले. सर्वांचे आभार मधुकर कदम यांनी मानले. 

फोटो अलिम शेख करमाळा तालुका प्रतिनिधी 
आदिनाथ कारखान्यावर रोलर पुजन पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर महेश चिवटे,  संजय गुटाळ, अरूण बागनवर आदि

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा