नंदीवाल्याच्या लग्न सोहळ्यात राजकीय नेतेमंडळींची लक्षणीय उपस्थिती ...
बेंबळे ।प्रतिनिधी
माढा तालुक्याच्या पश्चिमेकडील भीमा नदीकाठचे कोंढार भागातील गार अकोले हे गाव ,या गावातील मारुती रामा शिंदे हा नंदीवाला समाजातील एक युवक, परिस्थिती हलक्यांची पण बावडा आणि अकलूज येथील कॉलेजमधून बीए झाला, तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर खूप निष्ठा ,तर स्वर्गीय माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्यावर आपार प्रेम व निष्ठा, आर आर पाटील हेच त्याचे आदर्श. कशाही मार्गाने महिन्या दोन महिन्यातून मुंबईत जाऊन आर आर आबांची भेट घेणे, त्यांच्याशी प्रेम आपुलकी व सद्भावनेने बोलणे व काही गरीब लोकांची निस्वार्थ भावनेने कामे करून देणे हे तो कर्तव्य समजतो . अशाच एका भेटीत मारुती याने आर आर आबांना गार अकोले येथील माझ्या गरीबाच्या घरी आपण केव्हा येणार असे विचारले असता आर आर पाटलांनी त्यास होकार दिला व जाणीव ठेवून 2008 साली सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना भिमानगर उजनी धरण येथून आपल्या गाड्यांचा ताफा गार अकोले येथे मारुती शिंदे च्या घराकडे वळवला .मारुती व त्याच्या कुटुंबीयांनी आबांचे यथोचित स्वागत केले ,आबांनी या ठिकाणी नाश्ता करून चहा पण घेतला व सर्व कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी केली, तेव्हापासून या पंचक्रोशीत मारुतीचे नाव आबा शिंदे असे झाले. आर आर पाटील स्वर्गवासी झाले, सलग तीन दिवस आबांच्या अस्थि विसर्जन होईपर्यंत दुःखी अंतकरणाने मारुती तेथेच बसून होता.
मारुतीचे आणि आर आर बाबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील व चिरंजीव रोहित दादा तसेच बंधू सांगली डीसीसी बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे व घरोबाचे संबंध आहेत. 2018 साली पोलीस पाटील स्पर्धेमध्ये मारुती उत्तीर्ण झाला व तत्कालीन डीएसपी राजेश प्रधान यांनी मारुतीची मुलाखत घेताच त्यास गाराअकोलेचा पोलीस पाटील म्हणून नियुक्त केले, आता सर्वत्र मारुती हा आबा पाटील म्हणून ओळखला जाऊ लागला.
23 ऑगस्ट रोजी मारुती आबा पाटलाचा पुतण्या चिरंजीव तय्याप्पा व महाळुंग गट नंबर दोन (ता.माळशिरस) येथील रामा पवार यांची कन्या दीदी यांचा गार अकोले येथे दुपारी साडेबारा वाजता विवाह संपन्न झाला , तासगावहुन रोहन पाटील व आमदार सुमनताई पाटील यांनी येण्याचे कबूल केले होते परंतु ऐन वेळेस त्यांना माननीय शरद पवार यांनी बोलावल्यामुळे मुंबईला जावे लागले व लग्नाला येता आले नाही परंतु आर आर पाटलांचे बंधू सांगली डीसीसी चे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी अगोदरच मारुती यास फोनवरून मी येणार आहे असे कळून आवर्जून लग्नाला उपस्थित राहिले ,दिलखुलास गप्पा, जेवण करून व नूतन विवाहित जोडप्यास त्यांनी आशीर्वाद दिले ,यावेळी आर आर आबांच्या आठवणीने सर्वांना गहिवरून आले. तसेच यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले तर सभापती विक्रम दादा शिंदे हे आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी मारुतीच्या घरी एक मोठा राजकीय मेळावा जमलेला होता, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील संजय पाटील भिमानगरकर माजी उपसभापती धनाजी जवळगे राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील सचिव देठे पाटील माढा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परबत पाटील धनाजी काळे तसेच सरपंच माणीक झंजे साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख औदुंबर घाडगे उद्धव केचे संपत पाटील पवार हरीनाना देवकते दुर्योधन देवकते गावोगावचे पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी सरपंच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. जितेंद्र गायकवाड केशव देवकते सुरेश पवार माणिक पवार शिवाजी पवार आधी युवक मंडळींनी सर्वांचे स्वागत करून सत्कार करून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था पाहिली.
**** पोलीस पाटील मारुती उर्फ आबा पाटील यास फक्त 30 गुंठे जमीन आहे, परंतु निस्वार्थ भावनेने कार्य करण्याची तळमळ असल्यामुळे त्याची वैयक्तिक कामे कधीच अडत नाही व इतरांची कामे करण्यास मंत्रालयात गेल्यानंतर अनेक अधिकारी त्याला नावाने ओळखतात.
*** या लग्नामध्ये मारुतीचे 90 वर्षाचे वडील रामभाऊ शिंदे यांनी या सर्व आनंदा प्रीत्यर्थ आणि नातीचं लग्न आहे म्हणून हलगीच्या तालावर धरलेला ठेका आणि त्याचा व्हिडिओ काही टीव्ही चॅनल वरून देखील व्हायरल होत आहे. माणसाला जिद्द व चिकाटी असली म्हणजे परिस्थिती अडथळा ठरत नाही,' राखावी बहुतांची अंतरे.।.. भाग्य मिळते तदनंतरे....' या उक्तीची प्रचिती एका नंदीवाल्या समाजातील अतिशय गरीब मारुती शिंदे यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा