Breaking

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

कन्हेरगांव येथे ३१ ऑगस्ट रोजी भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान .



कन्हेरगांव येथे ३१ ऑगस्ट रोजी भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे   " ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग " या विषयावर जाहीर व्याख्यान कन्हेरगांव तालुका माढा येथे गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब ताटे , महेश माने यांनी दिली .


   कन्हेरगांव तालुका माढा येथे ३१ ते ७ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . पहिल्याच दिवशी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता  " ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग " या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे . या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आण्णासाहेब ताटे , महेश माने , किशोर मोरे , संजय डोके , विशाल मोरे , सुजित मोरे , अमित खोचरे , राम मोरे , संजय शिंदे यांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा