Breaking

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

रक्त सांडले तरी पुतळा काढू देणार नाही!!!शेटफळ ग्रामस्थांचा निर्धार!!शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक!!!!


रक्त सांडले तरी पुतळा काढू देणार नाही!!!
शेटफळ ग्रामस्थांचा निर्धार!!


शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक!!!!

करमाळा (प्रतिनिधी) अलिम शेख

शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढून त्या ठिकाणी ग्रामस्थांनी नवा पुतळा  उभा केला याला प्रशासनाने अडकाठी आणली असून वेळ पडली तर रक्त सांडू पण पुतळा काढणार नाही
शासनाच्या सर्व नियम व अटीची पूर्तता आम्ही त्यांच्या नियमाप्रमाणे करू पण बळजबरी करू देणार नाही असा इशारा शेटफळ गावच्या ग्रामस्थांनी आज झालेल्या ग्रामसभेत दिला

हा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाने नोटीस दिल्यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या पुतळ्या संदर्भात काही अडचणी आल्या तर मी स्वतः शेटफळला येईल अशी भूमिका भ्रमणध्वनी द्वारे शेटफळ ग्रामसभेत व्यक्त केली आहे

आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे
उप तालुका प्रमुख दादा थोरात
कारखान्याचे प्रशासकीय संचालक संजय गुटाळ
ब्रिगेडचे अध्यक्ष नितीन खटके
सहकार आघाडीचे अध्यक्ष श्री काळे
जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड मार्केट कमिटीचे संचालक दादा लबडे
सुमारे पाचशे शिवप्रेमी उपस्थित होते
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली वीस वर्षापासून मौजे शेटफळ येथे आहे हा पुतळा खराब झाल्यामुळे त्याच्या जागी अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे

गावामधून कोणाची लेखी या तोंडी तक्रार नाही असे असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन गावकरी सरपंच ग्रामसेवक यांना नोटीसा काढून पुतळा हटवण्याच्या क** भाषेत सूचना देत आहेत

याला शिवसेनेने विरोध केलेला आहे
आज सर्व ग्रामस्थांची व सर्वपक्षीय प्रमुख नेते मंडळींची ग्रामसभा शेटफळे येथे घेण्यात आली
*******
अमजद शेख फकीर राहणार शेटफळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी शेटफळ येथील सर्व मुस्लिम समाजाचा पाठिंबा असून आमचा या पुतळ्याला कसलाही विरोध नाही प्रशासनाने या पुतळ्याला अडकाठी आणू नये
********
अक्षय अक्षय धेडे
अध्यक्ष दलित दलित सेना शेटफळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गेली वीस वर्षांपूर्वी उभा केलेला आहे अठरापगड जातीला बरोबर घेऊन जाणारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमची अस्मिता असून या पुतळ्याला प्रशासनाने विरोध करू नये
*******
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी सोमवारी 28 ऑगस्ट रोजी सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते करमाळा तहसील कार्यालयात येऊन सविस्तर निवेदन देणार असल्याची माहिती सरपंच विकास संदिपान गुंड यांनी दिली आहे
///////

महेश चिवटे जिल्हाप्रमुख सोलापूर शिवसेना

या प्रकरणात गेली तीन दिवसापासून शिवसेनेने भाग घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य त्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत
नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची संपर्क साधलेला आहे
या सर्वांच्या समन्वयातून योग्य सन्मानकारक मार्ग काढण्यात येणार आहे
वेळप्रसंगी संघर्ष करायची वेळ आली तर यातील पहिला आरोपी होण्यास मी तयार आहे अशा शब्दात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा