कन्हेरगांव येथील तरुणांनी एकत्र येऊन केला हिवरे बाजार गावाचा अभ्यास दौऱा .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
कन्हेरगाव ता.माढा येथील २५ तरुणांनी एकत्र येऊन धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार या गावाला अभ्यास दौऱ्यानिमित्त ग्रामस्थ समवेतभेट दिली.
हिवरे बाजार येथील आदर्श गाव यासंबंधी पाहणी करून गावातील स्वच्छता , वाचनालय , गावातील सर्व मंदिरे , हागणदारीमुक्त गाव , पाणलोट क्षेत्र ,पाणी आडवा पाणी जिरवा, एक गाव एक उत्सव, गावातील आदर्श शाळा, गावातील राहणीमान घरे याची व्यवस्थित केलेली मांडणी पाहून वेगळे वाटले. गावातील नागरिकांविषयी असलेले नियम ग्रामपंचायतच्या विविध समस्या सोडवून आदर्श गाव कसे बनविता येईल याबाबत अभ्यासपूर्व दौरा आयोजित केला होता.
यावेळी आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार यांचा सत्कार कन्हेरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी गावात केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
या अभ्यास दौऱ्यात मार्केट कमिटीचे संचालक धनंजय मोरे, प्रगतशील बागायतदार ,जालिंदर केदार,पोपट मोरे, उद्योजक सतिश हांडे , सामाजिक कार्यकर्ते महेश माने, रोहन माने , अण्णासाहेब ताटे, संजय पाटील, राजेंद्र केदार , शुभम डोके पाटील , आण्णासाहेब मोरे ,संजय डोके, विजय डोके ,शुभम डोके ,आप्पासाहेब कोळी ,भारत लोखंडे ,बालाजी भरगंडे ,तानाजी पाटील ,रणजीत साळुंके ,अक्षय पाटील ,गणेश डोके ,विशाल मोरे ,अक्षय माने , सौरभ डोके आदी उपस्थित होते.
चौकट..
आदर्श गाव कसे असावे हे प्रत्यक्षात हिवरेबाजार या गावची पाहणी केल्यानंतर समजते या ठिकाणी असलेली पाण्याची नियोजन पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम उत्तम वाटली. या गावांमध्ये शेतकऱ्यांनी विहीर घेतल्यानंतर अगदी पाण्याची पातळी वरच आढळते. या गावातील बँक प्रणाली शाळा राहणीमान सर्वच गोष्टी प्रभावी वाटल्या.
- धनंजय मोरे,
संचालक -कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा