*लोकबोध चे संपादक अनिल ठोंबरे यांनी ए प्लस श्रेणी घेऊन वकील पदवी प्राप्त*
कुर्डुवाडी /प्रतिनिधी -
लोकबोध चे संपादक अनिल ठोंबरे (सर )यांनी ए प्लस श्रेणी घेऊन वकील पदवी प्राप्त झाली. शिक्षणाची व सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे विधी क्षेत्रातील कायद्याचा अभ्यास करून वकिली पदवी प्राप्त केली
आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. अशिक्षित व गरीब कुटुंबातून अनिल ठोंबरे यांनी विधी परीक्षेमध्ये 2219गुण मिळवून ए प्लस श्रेणी प्राप्त केली. गरीबी व दारिद्र्य वाट्याला आले म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंगे गावातील अनिल पंडित ठोंबरे या व्यक्तीने लहान वयापासूनच सतत धडपडत " कमवा आणि शिका " या तत्त्वाला धरून आज वयाच्या 40 व्या वर्षी सर्व पदव्या घेऊन वीधी क्षेत्रात देखील ( A+) ए प्लस ग्रेड घेऊन पास झाले.त्यांच्या पूर्वीच्या पदव्या पत्रकार ते संपादक,शिक्षक,अभिनेता,लेखक (स्पर्धा परीक्षा उपक्रम),पैलवान, विमा प्रतिनिधी व फायनल वकिली असा प्रवास झाला. वयाच्या नवव्या वर्षी इयत्ता तिसरीला असताना मुंबई या ठिकाणी आई-वडील,लहान भाऊ व बहीण असे एकत्रित भाड्याच्या रूममध्ये राहताना वडिलांना कधी काम मिळायचे तर कधी अडचणी यायच्या म्हणून अनिल ठोंबरे यांनी राहत्या भाड्याच्या रूमच्या शेजारच्या बांगड्या बनवण्याच्या कंपनीतुन बांगड्या बनवून द्यायचे व घर प्रपंच चालवायचे. पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटर चालत जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागे. नगरपालिका शाळेत चौथीपर्यंत मुंबईत शिक्षण पूर्ण केले. पाचवी रिधोरे,सहावी ते दहावी वडशिंगे व महाविद्यालयीन जीवन बार्शीला पूर्ण झाले. शेती वडिलोपार्जित कमी होती म्हणून महाविद्यालयीन शिक्षणासाठी बार्शी या ठिकाणी कॉलेज जीवनात "कमवा व शिका "स्कीम मधून जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी जॉब केला नंतर होम क्लासेस घेतल्या, पतसंस्थांचे पिग्मी गोळा केली, रिक्षा चालवली.अकरावी ते बीएससी पूर्ण शिक्षण महाविद्यालयात घेते वेळी विमा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले अशा पद्धतीने बी एस सी बी एड पूर्ण केले. त्यानंतर नाशिक सिन्नर एमआयडीसी मध्ये मॅट्रिक्स फर्मा मध्ये जॉब केला. पुणे येथे venky's nutrition मध्ये MR ship जॉब केला. यानंतर कुर्डूवाडी येथे क्लासेस चालू केल्या त्याचबरोबर कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरचे निर्मिती केली स्पर्धा परीक्षा पुस्तके लिहिली प्लॉटिंग एजंटची सुरुवात करून प्लॉट इन्वेस्टर चे काम पाहिले.
2014 साली पत्रकार म्हणून कामाची सुरुवात केली व 2021 साली स्वतःचा न्यूज पेपर, न्यूज चैनल व वेब पोर्टल चालू केले. विधी परीक्षा ए ग्रेड मध्ये पास झाले. अशा पद्धतीने लहानपणापासून ते आजतागायत अनिल पंडित ठोंबरे यांनी लोकबोध न्युज पेपर, चॅनल व वेब पोर्टल संपादक, अभिनेता, शिक्षक,क्लासेस चालक,एल आय सी विमा प्रतिनिधी,स्पर्धा परीक्षा पुस्तके निर्मिती लेखक,प्लॉटिंग इन्वेस्टर व वकिली या पदव्या संपन्न केलेले असे जिज्ञासू, चिकाटी, कष्टाळू,अभ्यासू, हसतमुख व्यक्तिमत्व आहे. अनिल ठोंबरे यांचा सत्कार माथाडी कामगार माजी सदस्य संतोष( मास्तर )चौधरी, कल्याण बागल,स्वप्निल (बापू )कापुरे,अहमद शेख,पत्रकार प्रकाश अवचर, नवनाथ पाटमस, सुरेश बागल, लक्ष्मण बागल,वकील कबीर शेख,समाधान लटके, धनाजी कोकरे,विनायकराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब (आण्णा) पाटील, पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब (आप्पा )पाटील, औदुंबर (बप्पा) पाटील,कांतीलाल तरंगे,माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक एन डि पाटील, विनायक पाटील, रघुनाथ शिंदे,डि ए पाटील, घोळवे, भोसले,बोबडे,उबाळे, गायकवाड, कांबळे लिपिक,फंड, अवचर, पठाण, जगताप, भिसे, नदाफ, टॉगळे, लेंडवे, उमाटे,देवकर, चौगुले, काळे,भोंग,रोकडे, फरड,नवले मॅडम, सुतार मॅडम,कुंभार मॅडम,सर्व पत्रकार, प्लॉटिंग इन्व्हेस्टर भानवसे, शिंदे, पवार, नायडू,शेख, खेडकर, नलवडे, कापरे, खेडकर, समर्थ, काशीद, केंगार, पावले, गोफने,गोसावी, महिंगडे, शेजाळ, खोत, सकट, राऊत, गायकवाड, माळी, त्याचप्रमाणे अमोल उन्हाळे सर, मधुकर ठोंबरे, सर्कल सूर्यकांत डिकोळे, पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, मेजर तानाजी गवळी, बागायतदार समाधान सुरवसे, दशरथ ठोंबरे,रोहिदास कदम, बापु जाधव, इसाकभाई शेख, संदीप पाटील, गणेश शिंदे, उत्तम शिंदे, दिलीप कदम, कोरबू, रविंद्र पाडुळे,प्रकाश आतकर, सज्जन गवळी, राणा, प्रविण मते,लोकबोध सर्व पत्रकार आदी. मान्यवर यांच्याकडून करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व मित्रमंडळी पाहुणे अधिकारी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा