Breaking

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

डिगुळे मित्रमंडळ लामजना ग्रुप च्या वतीने गुणवंतांचा सत्कार*.


*डिगुळे मित्रमंडळ लामजना ग्रुप च्या वतीने गुणवंतांचा सत्कार*.   



*औसा प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
"डिगुळे मित्रमंडळ लामजना" ग्रुप च्या वतीने जिल्हा परीषद प्रशाला लामजना येथे शाळेतील गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांचा बंद पाकीट व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.मार्च 2023 मध्ये इयत्ता 10 वी बोर्ड परिक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केल्याबद्दल, इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील उतीर्ण झालेल्या, इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या, नवोदय साठी निवड झालेल्या तसेच इस्त्रोसाठी निवड झालेल्या व शाळेतील होतकरू विद्यार्थी - विद्यार्थीनींचा, गुणवंतांचा बंद पाकीट व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डिगुळे मित्रमंडळ लामजना ग्रुप चे वैजिनाथ डिगुळे, सुरेश सरवदे, अक्षय पोतदार, विशाल जनार्धन कांबळे, आकाश भाटे, सुरज सगर, अमरनाथ माळी, सुमित हंचाटे, शुभम शिंदे, निलेश गायकवाड, श्रीहरी गायकवाड, शिवप्रसाद सरवदे, सुरेश शिंदे, अशोक पवार, प्रमोद बिराजदार, सुरज दंडगोले, विकास सरवदे, अंबादास सुर्यवंशी, राम चौगुले व ग्रुप मधील सदस्य, लामजना गावातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गोविंद भोजने, शिक्षक - शिक्षिका, विद्यार्थी वर्ग व गावातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा