Breaking

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण......., टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन पाचोर्‍याच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करा व आरोपीवर कठोर कारवाईची मागणी


पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरण......., 
टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन पाचोर्‍याच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करा व आरोपीवर कठोर कारवाईची मागणी



बेंबळे।प्रतिनिधी मुकुंद रामदासी  AJ 24 taas News Maharashtra साठी ....                                 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शनिवार दिनांक 12 रोजी माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहर व ग्रामीण  पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.

     जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटनेच्या संदर्भात सत्य वस्तूस्थितीजन्य परिस्थितीवर स्पष्टपणे विस्तृत बातमी दिली होती, याचा राग मनात धरून पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना फोन करून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती ,यातूनच आमदार किशोर पाटील यांच्या समर्थक असलेल्या गाव गुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली, परंतु ही कारवाई पत्रकार संरक्षण कायद्यानुसार करणे अपेक्षित होते तसे न करता पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षकानी आमदार किशोर पाटील यांच्या दबावामुळे किरकोळ कार्यवाही केल्यामुळे आरोपींना जामीन मिळाला असून आरोपी उजळ माथ्याने फिरत आहेत.

पत्रकार संदीप महाजन यांना केलेल्या मारहाणीची कार्यवाही ही पत्रकार संरक्षण कायद्यानुसारच करण्यात यावी, गुंडांना तातडीने अटक करण्यात यावी, त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हाव व आमदार किशोर पाटील यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द व्हावे या मागणीसाठी टेंभुर्णी शहर व परिसरातील ग्रामीण पत्रकारांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे जाऊन सर्वांच्या स्वाक्षरीनिशी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना कारवाईचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी संतोष वाघमारे सिद्धेश्वर शिंदे गणेश पोळ गणेश स्वामी विनय जोशी सचीन होदाडे सज्जन शिंदे, दीपक देशपांडे सुहास कांबळे प्रा. हरिश्चंद्र गाडेकर धनंजय भोसले प्रदीप पाटील विकास श्रीखंडे राजेंद्र दडस पिंटू सुरवसे याचबरोबर अनेक पत्रकार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा