माळशिरस तालुक्यातील 11 गावातील 2515 अंतर्गत कामासाठी १ कोटी ५ लाख रुपये मंजूर ...
आमदार बबनदादा शिंदे
माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील गावासाठी 2515 योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी एक कोटी पाच लाख रुपये चा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे या कामाच्या निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचेही आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
माळशिरस तालुक्यातील 2515 अंतर्गत गावोगावच्या कामाचे स्वरूप सांगताना आमदार शिंदे म्हणाले की १)वाघोली येथे सामाजिक सभागृह /सभामंडप बांधणे, सोलर हायमास्ट बसवणे, गावअंतर्गत व वाडीवस्त्यावरील रस्ते कॉंक्रिटिकरण/ मजबुतीकरण करणे, पेविंग ब्लॉक बसवणे, पाणीपुरवठा योजना करणे, स्वागत कमान उभारणे व इतर सुविधासाठी ५ लाख रुपये, 2)विठ्ठल वाडी येथे शेळके वस्ती मारुती मंदिर सभामंड बांधण्यासाठी ९ लाख रुपये,3) मौजे मिरे येथे मगर शेड ते मुलाणी वस्ती रस्ता करणे ५ लाख रुपये,4) कोंढार पट्टा येथे व्यायाम शाळा बांधणे १० लाख रुपये,5) वाफेगाव येथे कृष्ण मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे ७ लाख रुपये ,6)बोरगाव येथे १) डी 19 अंतर्गत रस्ता करणे (१० लाख ) व२) मस्के वस्ती रस्ता करणे( ५ लाख ) असे एकूण... १५ लाख रुपये, 7)मौजे खळवे येथील रणवरे वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत मारुती मंदिरासमोर सभा मंडप बांधणे ९ लाख रुपये,8) लवंग येथे ग्रामपंचायत जागेत मारुती मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 15 लाख रुपये, 9)नेवरे येथे सोनार सिदोबा मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे १० लाख रुपये,10) माळेवाडी (बो.) येथे वार्ड क्रमांक १,२,३ मध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख रुपये,11) माळखांबी येथील१) माळखांबी- वेळापूर रोड ते मनोज शेळके वस्ती रस्ता सुधारणे करिता (४ लाख ),२) माळखांबी वेळापूर रोड ते दादासाहेब गमे वस्ती रस्ता खडीकरण/ मुरमीकरण करणे (३ लाख ),३) भाटघर कॅनॉल - 27 ते जिल्हा परिषद शाळा शिवेचा मळा माळखांबी रस्ता सुधारण्यासाठी (३ लाख ) असे एकूण १० लाख रुपये याप्रमाणे एकूण १कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याचे आमदार शिंदे यांनी या वेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा