*माढा तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना 12 लाख विमा रक्कम मंजूर.......तालुका कृषी अधिकारी बी डी कदम*
*गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत*
AJ 24 taas News साठी टेंभुर्णी/ प्रतिनिधी -गणेश चौगुले
गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा शेती काम करत असताना अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रति शेतकरी दोन लाख रुपये अपघात विमा तालुकास्तरीय कमिटीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर केलेला आहे तरी माढा तालुक्यातील खालील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मंजूर झालेली प्रति शेतकरी दोन लाख रुपये विमा रक्कम थोड्याच कालावधीमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये( प्रति शेतकरी दोन लाख रुपये )जमा करण्यात होणार आहेत.
माढा तालुक्यातील मयत शेतकऱ्यांची नावे व त्यांचे गाव पुढील प्रमाणे १) आजिनाथ सावता कुबेर सापटणे टेंभुर्णी २)अभिमान देवराव गाडे अंबड ३)विजया सुभाष शिंदे आडेगाव ४) शोभा विश्वनाथ परबत तडवळे ५)नागनाथ पंडित सुर्वे अरण ६)विष्णू भानुदास जगताप शिराळ टेंभुर्णी असे उपरोक्त मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रति शेतकरी दोन लाख रुपये विमा मंजूर करण्यात आलेला आहे असे तालुकास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी श्री बी डी कदम साहेब यांनी माहिती दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा