Breaking

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

माढा विधानसभा मतदारसंघ.....पाच ठिकाणी वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवणे व पाच ठिकाणी 33/11 के व्ही ची सबस्टेशन्स उभारण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेश. आ बबनदादा



माढा विधानसभा मतदारसंघ.....
पाच ठिकाणी वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवणे व पाच ठिकाणी 33/11 के व्ही ची सबस्टेशन्स उभारण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेश. आ. बबनदादा शिंदे



 बेंबळे ।प्रतिनिधी   *     मुकुंद रामदासी बेंबळे 
                   

        माढा विधानसभा मतदारसंघातील पडसाळी, अरण, भेंड, वरवडे व परिते या ठिकाणी वाढीव ट्रान्सफॉर्मर्स बसवण्यासाठी तसेच  माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील जाधववाडी( मो.) /बैरागवाडी, घोटी व बावी ,पंढरपूर तालुक्यातील चीलाईवाडी व माळशिरस तालुक्यातील जांबूड या गावी नवीन
 33 /11 के व्ही चे सबस्टेशन होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कडे प्रस्ताव सादर करून , या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्या मुळे वीज मंडळाच्या या कामांना  शासनातर्फे मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
                         अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की माढा विधानसभा मतदारसंघात विजेची समस्या असून शेतकऱ्यांना नियमित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी माढा मतदारसंघातील पडसाळी, अरण, भेंड ,वरवडे व परिते या पाच ठिकाणी असलेल्या विद्युत सबस्टेशन मध्ये 5 एम व्ही ए चे नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवून मिळावेत म्हणजे संबंधित गाव व परिसरातील इतर गावांना योग्य व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होईल. त्याचप्रमाणे माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील जांबूड, पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी व माढा तालुक्यातील जाधववाडी (मो.)/ बैरागवाडी, घोटी व बावी अशा एकूण पाच गावी 33 /11 के व्ही च्या नवीन सबस्टेशनची उभारणी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. 
 उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी प्रमुख वरिष्ठ अधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यासमवेत  मुंबई मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली व माढा विधानसभा मतदारसंघातील पाच गावी पाच एम व्ही ए चे वाढीव ट्रान्सफॉर्मर्स बसवण्याचे व मतदार संघातील पाच गावी नवीन 33/11के.व्ही.चे  सबस्टेशन्स उभारण्याचे निर्देश/आदेश दिले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.   या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा , मुख्य अभियंता प्रवीण परदेशी व बारामती सोलापूर व बार्शी या ठिकाणचे वीज मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा