Breaking

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे तर तीन पोलीस अधिकारी निलंबित!


. जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे तर तीन पोलीस अधिकारी निलंबित!


मुंबई (मिलिंद माने) | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत या . बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले 

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले
 मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण बाबींवर निर्णय घेण्यात आला त्यामध्ये(1). जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर लाठीमार करणारे तीन पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात येईल
(2) . जालनातील आंदोलकांवर जे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेणार
(3). मराठा समाजाला आरक्षणासाठी नेमलेल्या समितीसाठी एक महिन्याची मुदत वाढ
(4). जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा सर्वपक्षीय ठराव या बैठकीत घेण्यात आला
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे,  गौतम सोनवणे आदी नेते उपस्थित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा