Breaking

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्या तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप सुरू .. 42 हजार शेतकऱ्यांना घरपोच साखर मिळणार आ.बबनदादा शिंदे


विठ्ठलराव शिंदे  साखर कारखान्या तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप सुरू ..
 42 हजार शेतकऱ्यांना घरपोच साखर मिळणार
                                    आ.बबनदादा शिंदे



 बेंबळे। प्रतिनिधी                         फोटो
            विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट - एक व करकंब युनिट - दोन या ठिकाणी ऊस पुरवठा करणाऱ्या 42हजार ऊस उत्पादक सभासदांना, १५००रु.ला 50 किलो ची एक गोणी याप्रमाणे 21हजार क्विंटल साखरेचे गावोगावी घरपोच वाटप करण्याचे काम  सुरू झाले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे. याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, केन मॅनेजर संभाजी थिटे व जनरल मॅनेजर सुहास यादव उपस्थित होते.

 सविस्तर माहिती अशी की प्रत्येक वर्षी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन तर्फे  ऊस उत्पादक सभासदांना दिवाळी सणासाठी 50 किलो साखरेची एक गोणी  माफक दरात घरपोच दिली जाते.या हंगामात देखील कारखाना कार्यक्षेत्रातील माढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, इंदापूर, बार्शी, लोहारा , परांडा व अन्य ठीकाणचे असे एकूण 42 हजार  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 21 हजार क्विंटल साखरेचे घरपोच वाटप केले जात आहे.    
           मागील गळीत हंगामात ज्या शेतकऱ्यांचा ऊस गळितास आलेला असेल त्यांच्या अंतिम ऊस बिलातून 50 किलोच्या एक गोणीस १५०० रुपये
प्रमाणे रक्कम कपात केली आहे तर ज्या सभासद शेतकऱ्यांचा ऊस मागील गळीत हंगामात आलेला नाही त्यांना रोखीने  पंधराशे रुपये  एक गोणी या प्रमाणे  साखर दिली जात आहे, कार्यक्षेत्रातील एकुण 42हजार शेतकऱ्यांना 21हजार क्विंटल साखर घरपोच वाटप करणे सुरू झाले आहे असेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा