*श्री शारदेय गुरुकुल मध्ये एक धागा कृतज्ञतेचा , एक धागा प्रेमाचा' कार्यक्रम उत्साहात साजरा .*
टेंभुर्णी प्रतिनिधी /रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून 'एक धागा कृतज्ञतेचा, एक धागा प्रेमाचा ' हा उपक्रम श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये नुकताच पार पडला. आपण नेहमी आपल्या जिवाभावाच्या लोकांना व आप्तस्वकियांना राख्या बांधत असतो परंतु असे अनेक अदृश्य हात असतात जे देशाची, समाजाची व आपल्या सर्वांची सेवा अहोरात्र तत्परतेने करत असतात .
यामध्ये प्रामुख्याने आपले पोलीस खाते व आरोग्य खातं हे आपले रक्षण व संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस राबत असतात. या कार्यक्रमाप्रसंगी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे ,पो.साळूंके, व त्यांचा स्टाफ व प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी लाकाळ जी. एच . मॅडम व स्टाफ उपस्थित होते.
या समाज बांधवांशी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व महिला शिक्षकांनी या समाज बांधवांना विद्यालयामध्ये बोलवून त्यांना राख्या बांधल्या व व त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता, प्रेम व आदर व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक ओमासे, व वैद्यकीय अधिकारी लकाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. श्री शारदेय गुरुकुल परिवाराचे आभार मानले.
या बरोबरच शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकमेकास राख्या बांधुन एकमेकांबद्दल असणारे आदर व प्रेम व्यक्त केले. संस्थेच्या अकॅडेमीक डिरेक्टर मा. ब्राम्ही मॅडम व कॉर्डिनेटर श्री . संजय इंगोले सर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष बी . एल. देशमुख, सचिव हर्षवर्धन देशमुख व डायरेक्टर सौ. प्रियंका देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बोधक सर यांनी केले व आभार प्रदर्शन गणेश खांडावकर सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा