साजन पाचपुतेनी बांधले शिवबंधन....
उपनेतेपदी पाचपुतेची वर्णी...
श्रीगोंदा- नितीन रोही, तालुक्यातील काष्टीचे लोकनियुक्त सरपंच साजन सदाअण्णा पाचपुते यांनी सोमवारी सायंकाळी ५: ००वा.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. साजन हे माजी मंत्री आणि भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणे अतिशय मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.
बबनदादा यांचे बंधू सदा अण्णा यांच्या निधनानंतर कुटुंबात फूट पडल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता पाचपुते यांच्या राजकारणात सदाअण्णाचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा साजन काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पाचपुते यांनी त्यांना गृहित धरून राजकारण केले. आपल्या मुलाला राजकारणात आणले. मात्र, साजन यांना हे पटले नसावे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली. त्यामध्ये साजन यांनी १६१मताने विजय मिळवत राजकारणात स्वतंत्रपणे प्रवेश केला. त्यानंतर साजन यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली. गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते हे तालुक्यातील कोणत्या नेत्याला सोबत घेऊन जातात हे लवरच सिद्ध होईल. साजन यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे यांनी साजन यांना पक्षाच्या उपनेते पदाची जबाबदारी दिली. यावेळी खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, शहराध्यक्ष संतोष खेतमलीस यांच्या सह साजन यांची आई/पत्नी व तालुक्यातील विविध ठिकाणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा