**आढेगाव न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दहीहंडी उत्सव आनंदात साजरा**
गुरुवार दी.7 सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल आढेगावमध्ये बालगोपाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली. दहीहंडी हा सण आपला पारंपारिक उत्सव आहे. यावेळी मुले श्रीकृष्णाची व राधेची भूमिका अतिशय सुंदर अशा प्रकारे निभावली. सर्व बाळगोपाळाने अतिशय सुंदर असे डान्स केले. मनोराच्या माध्यमातून नाचत रंगत दहीहंडी मोठ्या उत्साहात फोडण्यात आली. यावेळी मुलांनी सर्वांनी आनंदाने भोजन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल माने ,अतिश चव्हाण,प्रदीप खटके , सलीम सय्यद, मनीषा माने, राणी डांगे, पल्लवी कोळी,सारिका लोकरे, काजल पराडे, मेघा जगताप, विकास उगले रंजीत विरकर, तेजस भाग्यवंत, विजय पिसाळ, यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा